आईला घरी येते म्हणाली पण आढळला मृतदेह ! चेहऱ्यावर ॲसिड फेकून, शरीरावर चाकूचे भयानक वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:16 IST2026-02-04T20:15:18+5:302026-02-04T20:16:20+5:30

Gondia : मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील बोंडराणी जंगलात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

Mother told him to come home but found dead! Acid thrown on his face, horrific knife stabs on his body | आईला घरी येते म्हणाली पण आढळला मृतदेह ! चेहऱ्यावर ॲसिड फेकून, शरीरावर चाकूचे भयानक वार

Mother told him to come home but found dead! Acid thrown on his face, horrific knife stabs on his body

गोंदिया : मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील बोंडराणी जंगलात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकल्याचे व शरीरावर जखमा असल्याचे आढळल्याने या महिलेचा खून करून मृतदेह जंगलात फेकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी नोंद केली आहे. पूनम राकेश तुमाने (वय २८) रा. खैरी बालाघाट असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेश राज्यातील बालघाट जिल्ह्यातील पूनम राकेश तुमाने ही महिला २८ जानेवारी रोजी खैरी येथीलच संजय तितमारे याच्यासोबत वाराशिवनी न्यायालयात पेशी असल्याचे सांगून घरून आली होती. यानंतर पूनम व संजय हे दोघेही २८ जानेवारीला तिरोडा तालुक्यातील परसवाडा टी पाईटवर आले. तिथून पूनमने आपल्या आईला घरी येणार आहे एवढे सांगून फोन कट केला. मात्र रात्री उशिरापर्यंत पूनम घरी परतली नाही. तर संजयने पूनमच्या घरी जाऊन तुमची मुलगी माझ्यासोबत परत आली नाही. ती घरी आली का अशी विचारणा पूनमच्या वडिलांना केली. यानंतर ते वाराशिवणी व रामपायलीकडे पूनमचा शोध घेण्यासाठी गेले. पण तिचा शोध न लागल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी पूनमचा शोध घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी दुपारच्या सुमारास बोंडराणी जंगलाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह चंद्रकुमार भगत या शेतकऱ्याला आढळला. त्यांनी याची माहिती गावकरी व दवनीवाडा पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिस व घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, सहायक पोलिस निरीक्षक संजय टेकाम हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास दवनीवाडा पोलिस करीत आहेत.

फॉरेन्सिक पथकाला केले घटनास्थळी पाचारण

बॉडराणी जंगल परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकल्याचे व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. तसेच मृतदेहाच्या ठिकाणी एक लोखंडी बत्ता आणि चाकू आढळला. दरम्यान पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक चमूला पाचारण केले होते.

अशी पटली मृतदेहाची ओळख

खैरी येथील रहिवासी महिला पूनम तुमाने ही २८ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार खैरलांजी पोलिस स्टेशन दाखल होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी बोंडराणी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तर महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर दवनीवाडा पोलिसांनी खैरलांजी व मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पूनमचे कुटुंबीयसुद्धा मृतदेह पाहण्यासाठी बोंडराणी येथे पोहचले. त्यांनी तो मृतदेह पूनमचा असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतरच हा मृतदेह बेपत्ता असलेल्या पूनम तुमाने या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले

Web Title : जंगल में महिला का शव मिला, चेहरे पर एसिड, शरीर पर चाकू के वार।

Web Summary : 28 जनवरी से लापता पूनम तुमाने का शव जंगल में मिला। उसके चेहरे पर एसिड डाला गया था और शरीर पर चाकू से कई वार किए गए थे। पुलिस हत्या की जांच कर रही है।

Web Title : Woman found dead in forest with acid on face, stabbed.

Web Summary : Poonam Tumane, missing since January 28, was found dead in a forest. Her face was burned with acid, and she had multiple stab wounds. Police are investigating the murder.