शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातून बेपत्ता जगदीशचा मृतदेह विहिरीत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST

माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात ते कामही करायचे.

ठळक मुद्देगावात एकच खळबळ : नाट्यप्रेमी जगदीश च्या मृत्यूने नवेगाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार (४०) यांचे प्रेत विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, मृत जगदीश बुधवारपासून (दि.११) चंद्रपुर येथून बेपत्ता होते.येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात ते कामही करायचे. नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.११) सकाळी १० वाजता जगदीश कामावर गेले. परंतु नेहमीच्या वेळेवर ते व्यसनमुक्ती केंद्रात रात्री पोहोचले नाही. तेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातून येथील त्यांच्या कुटुंबियांना गुरु वारी (दि.१२) ते बेपत्ता असल्याचे कळविण्यात आले. जगदीश घरी सुद्धा आले नाही यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.तेव्हा त्यांची पत्नी केशर डोेंगरवार यांनी आपल्या वडिलांसोबत चंद्रपूरला जाऊन शनिवारी (दि.१४) शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व त्या रात्री घरी परतल्या. मात्र रविवारी (दि.१५) माऊली मोहल्ल्यातील एक महिला पाणी भरण्यासाठी सकाळी ६ वाजतादरम्यान विहिरीवर गेली असता त्यांना मृतदेह तरंगतांना दिसला. याची माहिती तिने परिसरातील लोकांना दिली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांनी पोलिसांना माहिती दिली व उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले असता चंद्रपुर येथून बेपत्ता जगदीश डोंगरवार यांचे मृतदेह असल्याची खात्री पटली. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. बुधवारी सायंकाळी सौंदड येथे तसेच गुरूवारी देवलगाव रेल्वे स्थानकावर जगदीशला काहींनी बघितल्याचे सांगितले जाते. केशर डोंगरवार यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.जगदीश डोंगरवारचे वडील गोपाळा डोंगरवार हे येथील श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळाचे व्यवस्थापक होते. बालपणापासूनच वडिलांच्या नाटकाशी असलेल्या संबंधामुळे जगदीशलाही नाटकाचे वेड लागले. नाटकाच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असे. अनेक नाट्यप्रयोगाचे त्यांनी आयोजन केले होते. त्यांच्या नाट्यप्रेमासाठी जगदीश नवेगावबांधवासियांच्या नेहमीच लक्षात राहतील.