मेळाव्यात रंगल्या सखी

By Admin | Updated: February 4, 2016 01:57 IST2016-02-04T01:56:25+5:302016-02-04T01:57:23+5:30

लोकमत सखी मंच गोरेगावतर्फे मनोरंजन भवन नगर पंचायत गोरेगाव येथे (दि. ३०) रोजी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Meetings in Milan | मेळाव्यात रंगल्या सखी

मेळाव्यात रंगल्या सखी

वाण वाटले : शेकडो महिलांची उपस्थिती
गोंदिया : लोकमत सखी मंच गोरेगावतर्फे मनोरंजन भवन नगर पंचायत गोरेगाव येथे (दि. ३०) रोजी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आशा अगडे, अतिथी म्हणून देवयानी लोखंडे, चंद्रिकापुरे, बहेकार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे पूजनाने करण्यात आली.
प्रास्ताविक सूषमा बहेकार, वैशाली, संचालन सुरेखा बागडे यांनी तर आभार संयोजिका वैशाली कोठेवार यांनी मानले. यावेळी उखाण व मॅचिंग ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. सखींना हळदी-कुंकू, तिळगूळ व वाण वाटण्यात आले.
उखाणे स्पर्धेत रेखा बहेकार यांनी प्रथम, सुषमा यांचा द्वितीय क्रमांक, मॅचींग ड्रेस स्पर्धेत लोखंडे प्रथम तर साखरे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विजयी सखींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यशस्वीतेसाठी सरीता मसराम, गीता सयाम, सुषमा पखाडे, संगीता गावड, उषा बिरजरे, मीरा दहीकर, उमा कटरे, प्रभा वडेगावकर, अनुराधा देशमुख, शाहीन सैय्यद, कपाट यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Meetings in Milan