शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नदीत फेकली बालकांची औषधी

By admin | Updated: November 2, 2015 01:24 IST

आमगाव मार्गावर असलेल्या पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोंदिया : आमगाव मार्गावर असलेल्या पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेकण्यात आलेली ही औषधी मुदतबाह्य असली तरी तिला जमीनीत न पुरता उघड्यावर फेकण्यात आल्याने मात्र एकच खळबळ माजली आहे.जिल्ह्यात औषधी उड्यावर फेकण्याचे प्रकार काही नविन नाही. मात्र उघड्यावर फेकण्यात आलेल्या या औषधींमुळे यापासून धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्ह्याच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सन २०१० मध्ये फेरोफोला नावाची बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आली होती. त्या प्रकरणात सहा. जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच औषध निर्माता असे १४ कर्मचारी निलंबित झाले होते. हा प्रकार जूना नसताना तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथेही औषधी उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे.एकामागे एक असे प्रकार घडत असतानाच त्यात भर घालत आमगाव मार्गावरील पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची आर बी टोन, झायमेक्स, बोनीसपाझ अशी औषधी उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून आले. ही औषधी खासगी मेडिकलमधील आहे किंवा शासकीय आहे हे स्पष्ट झाले नसले तरी ही मुदतबाह्य औषधी विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून पांगोली नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्यात आल्याचे समजते. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात कोठेही व केव्हाही औषध फेकण्यात येत असल्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. आता या प्रकरणात आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी) वडेगावचे औषध प्रकरण डीएचआेंच्या दालनातवडेगाव येथील बेवारस फेकलेल्या औषध प्रकरणाबाबत तालुका व जिल्हास्तरीय चौकशी करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. परंतु या प्रकरणात कोण दोषी? औषधी आली कोठून या संदर्भात कसलीही माहिती माध्यमांना मिळाली नाही.