शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपाने संकलनातून अनेकांना मिळणार रोजगार

By admin | Updated: April 1, 2015 00:48 IST

जिल्ह्यात जंगले मोठ्या प्रमाणात असून वनसंपदासुद्धा भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळा आला की जिल्ह्यातील अनेकांना तेंदूपाने संकलनातून रोजगार प्राप्त होतो.

गोंदिया : जिल्ह्यात जंगले मोठ्या प्रमाणात असून वनसंपदासुद्धा भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळा आला की जिल्ह्यातील अनेकांना तेंदूपाने संकलनातून रोजगार प्राप्त होतो. यंदा २७ कंत्राटदारांना तेंदूपाने संकलनाचा परवाना मिळाल्याने अनेक मजुरांना यातून रोजगार मिळणार आहे.जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या तेंदूपाने संकलनातून वन विभागाला नऊ कोटी ५० लाख रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे कामासाठी ४६ हजार ग्रामस्थांना वनालगत दुर्गम भागात मे महिन्यातील उन्हाळ्याच्या काळात रोजगार उपलब्ध होणार आहे. वन विभागातर्फे तेंदू संकलनासाठी सन २०१५ मध्ये तेंदूपाने घटकांची ई-निविदा मागविण्यात आली. परवाना मिळविण्यासाठी २९ कंत्राटदारांनी निविदा सादर केली. यापैकी २७ कंत्राटदारांना परवाना प्राप्त झाल्याची माहिती आहे. या कामातून मजुरांना मिळणाऱ्या रकमेशिवाय शासनाला प्राप्त होणाऱ्या महसुलातून व्यवस्थापनाचा खर्च वजा करण्यात येणार आहे. त्यातून शिल्लक महसुलाची रक्कम शासनाच्या निर्धारित धोरणानुसार वितरित करण्यात येणार आहे. बोनसचे वितरण पारदर्शक होण्यासाठी जन-धन योजनेंतर्गत बँकेत बचत खाते उघडण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा देण्यात येत आहे.