होळीचा बाेजारा दिला नाही म्हणून केला जितेंद्रचा खून; आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 15:45 IST2022-03-22T15:41:15+5:302022-03-22T15:45:05+5:30

आरोपी अविनाश भुते याने त्यांची कार अडवून शिवीगाळ करीत होळीच्या कोलतीने त्यांच्या डोक्यावर तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले.

man killed due to not gave money for holi bozara | होळीचा बाेजारा दिला नाही म्हणून केला जितेंद्रचा खून; आरोपी पसार

होळीचा बाेजारा दिला नाही म्हणून केला जितेंद्रचा खून; आरोपी पसार

ठळक मुद्देगोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल

गोंदिया : होळीचा बोजारा दिला नाही यावरून आरोपीने युवकाच्या डोक्यावर कोलतीने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री ११ शहरातील शास्त्री वॉर्डात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र पन्नालाल पारधी (३५, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) यांचा उपचारादरम्यान गोंदियाच्या जानकी हॉस्पिटलमध्ये २१ मार्च रोजी सायंकाळी ६.११ वाजता मृत्यू झाला.

जितेंद्र पारधी हे आपल्या मेडिकलमध्ये असतांना आरोपी अविनाश अशोक भुते (३०, रा. मडी चौक, गोंदिया) हा बोजारा मागण्यासाठी त्यांच्या मेडिकलमध्ये गेला. परंतु त्यांनी बोजारा दिला नाही. त्यानंतर जितेंद्र पारधी जेवणासाठी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या कारने शास्त्री वॉर्डातील भाऊ धमेंद्र पन्नालाल पारधी (३४) यांच्या घरी जात असताना आरोपी अविनाश भुते याने त्यांची कार अडवून शिवीगाळ करीत होळीच्या कोलतीने त्यांच्या डोक्यावर तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जितेंद्र पारधी यांना उपचारासाठी गोंदियाच्या जानकी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २१ मार्चच्या सायंकाळी ६.११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. आरोपी फरार असून, त्याच्या मागावर गोंदिया शहर पोलीस आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे करीत आहेत.

Web Title: man killed due to not gave money for holi bozara