शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियाने आठ तर डेंग्यूने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: November 8, 2014 01:24 IST

जिल्ह्यात डेंग्यूने नव्हे तर मलेरियाने थैमान घातले होते. परंतु मलेरिया झालेल्या रुग्णांना ही डेंग्यू झाल्याचा कांगावा जिल्हाभरात करण्यात आला.

गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यूने नव्हे तर मलेरियाने थैमान घातले होते. परंतु मलेरिया झालेल्या रुग्णांना ही डेंग्यू झाल्याचा कांगावा जिल्हाभरात करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया यंदा दुपटीने वाढल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१३ मध्ये मलेरियाचे ६० रुग्ण आढळले होते. मात्र चालू वर्षात १२१ रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याचा वार्ता झडकत होत्या. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन डेंग्यूची माहिती काढल्यास महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक असल्याचे जाणवले. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश नाही. परंतु गोंदिया जिल्ह्यात मलेरियाने थैमान घातले आहे. सन २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये दुपटीने मलेरियाचे रुग्ण आढळले. यात मृताची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. मागच्या वर्षी मलेरियाचे ६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र यावर्षी १२१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागच्या वर्षी डेथ फाल्सी फोरम रेट ३८ होता. मात्र यावर्षी १०० आहे. मागच्या वर्षी मलेरियाने चौघांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी चार वेळा मलेरियाचा उद्रेक झाला होता. परंतु यावर्षी १० वेळा मलेरियाचा उद्रेक झालेला आहे. जिल्ह्यात डेंग्यू मागच्या वर्षीसारखा राहिला. मागच्या वर्षी डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला होता. याही वर्षी डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी डेंग्यूचा नऊ वेळा उद्रेक झाला होता. परंतु यावर्षी डेंग्युचा आठ वेळा उद्रेक झाला आहे. मागच्या वर्षी डेंग्युचे ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. यावर्षी ५३ जण डेंग्यूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. (तालुका प्रतिनिधी)