गोंदिया : आझाद हिंद एक्सप्रेसचे ब्रेक लायनर घर्षण होवून गाडीतून धूर निघण्यास सुरूवात झाली. सुदैवाने आग लागली नाही. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना आज(दि.६) सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास हावडा मुंबई मार्गावरील गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
रविवार सायंकाळी हावडाकडून मुंबईकडे जाणारी हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ही गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटल्यानंतर गंगाझरी रेल्वे स्थानक दरम्यान गाडीचे ब्रेक लायनर रुळाला घासल्याने त्यातून धूर निघण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लोकोपायलटने गाडी थांबवली. गाडी थांबतात गाडीतील प्रवासी गाडीतून धूर निघत असल्याचे पाहून गाडीतून खाली उतरले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. ब्रेक लायनर रुळाला घासल्याने हा प्रकार घडल्याचे माहीती आहे.