शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी तुकडी टिकवा

By admin | Updated: May 25, 2014 23:38 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी मारू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नवनविन शक्कल लढविली जात आहे. तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ असते. यामुळे अनुदानित तुकड्या

खासगी शाळांमधील प्रकार : ‘टीसी द्या अन् सायकल घ्या’ चा उपक्रम

नरेश रहिले - गोंदिया

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी मारू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नवनविन शक्कल लढविली जात आहे. तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ असते. यामुळे अनुदानित तुकड्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांची नोकरी धोक्यात आहे. यामुळे आपली नोकरी टिकविण्यासाठी अनुदानित या शाळांतील शिक्षक तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत दाखला घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाने १५ वर्षा अगोदर अनुदानित शाळा देण्याची खैरात वाटली. त्यामुळे ग्रामीण भागातही अनुदानित शाळांची संख्या अधिक आहे. शासनाचे अनुदान लक्षात घेता अनेक संस्थासंचालकानी एकाच शाळेत एकाच वर्गाच्या चार ते सात तुकड्या सुरू केल्या. यामुळे या सर्व तुकड्यांना शासनाचे अनुदान मिळू लागले. अनुदान कायमस्वरूपी मिळविण्याचा खटाटोप संस्था संचालकांचा सुरू झाला. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ लागल्याने या अनुदानित शाळांतील तुकड्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. या तुकड्या तुटल्या तर या तुकडीतील शिक्षकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. यामुळे आपली तुकडी वाचविण्यासाठी खासगी शाळांतील शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले. खासगी शाळांच्या संस्थासंचालकांनी तुकडी टिकविण्याची धुरा त्या शाळांतील शिक्षकांवर टाकली आहे. हे आपले नशीब समजून ते शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी पाहिजे त्या प्रकारचे आमिष विद्यार्थ्यांना देऊन आपल्या शाळेत नाव दाखल करण्यास भाग पाडतात. असाच एक प्रकार गोंदिया तालुक्याच्या शिवणी येथील संत कबीर हायस्कूलमध्ये घडला. या शाळेत इयत्ता आठवीच्या तीन तुकड्या आहेत. तर या वर्षापासून इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या प्रत्येकी एक तुकडी अंशत: अनुदानावर येत असल्याची माहतिी आहे. या तुकड्यांना टिकविण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापकीय मंडळाचा खाटोप सुरू आहे. संत कबीर हायस्कूलच्या तुकडी वाचविण्यासाठी तेथील शिक्षकांनी घिवारी, हाबूटोला, तेढवा व इतर गावातील विद्यार्थ्याना रेंजर सायकल व शैक्षणिक साहित्यासाठी एक हजार रूपये दिल्याची ओरड नजीकच्या गावातील पालकांमध्ये सुरू आहे. परंतु या शाळेचीच्या सर्व तुकड्या टिकविण्यासाठी शिवणी, गर्रा, उमरी व निलज येथील विद्यार्थ्यांची संख्या महत्वपुर्ण असते. तरी देखील या शाळेच्या शिक्षकांनी शिवणी, गर्रा, उमरी व निलज येथील विद्यार्थ्यांना मदत न करता बाहेरच्या विद्यार्थ्यांना सायकल दिल्यामुळे या चार गावातील पालकांच्या मनात आक्रोश आहे.

या संदर्भात मुख्याध्यापक तनवानी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केल्यावर ते म्हणाले, आमच्या शाळेतील शिक्षकांनी बाहेरच्या गावातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याचे सांगितले. परंतु दत्तक घेतांना गरिब किंवा गरजू विद्यार्थ्यांंचा विचार करण्यात आला नाही. तर तुकडी टिकविण्यासाठी लांबपल्याच्या गावातील विद्यार्थ्यांना मदत केली.