शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘माहेर घरात’ ३६३ गर्भवतींना सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:56 IST

आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूती पूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेर घर’ योजना सुरू करण्यात आली.

शासन खर्च करण्यासाठी तत्पर : ५० टक्के महिलांनी घेतला लाभ नरेश रहिले   गोंदिया आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूती पूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेर घर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे ५० टक्के महिलाच फक्त लाभ घेत आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ३६३ महिलांनी ‘माहेर घर’ योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत मागच्या वर्षी २ लाख ९९ हजार ४०० रूपये खर्च करण्यात आले आहे. या योजनेवर मंजूर निधीतून फक्त ३४.२१ टक्के निधी खर्च झाला आहे बहुतांश आदिवासी लोक टेकडी भागात वास्तव्य करतात. जिल्ह्यात आदिवासींच्या बहुतांश गावात पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे गर्भवती महिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी सोय नाही. दुरध्वनी सेवा खंडीत, मोबाईलचीही समस्या होते. यामुळे योग्य उपचारासाठी अभावी आदिवासी गावात बाल व मात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. या स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक आदिवासी गावात महिलांसाठी सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेर घर योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्याच्या १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माहेर घर’ तयार करण्यात आले. सुरक्षित व आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी गर्भवती महिला व तिच्या बालकाला राहण्याची सोय करून देण्यासाठी मोहर घर ही योजना अमंलात आणण्यात आली. ७३३ महिलांची पीएचसीत प्रसूती जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात मुल्ला, मोहांडी, ककोडी, अर्जुनी मोरगावच्या केशोरी, गोठणगाव, कोरंभीटोला, महागाव, चान्ना बाक्टी, सडक अर्जुनीच्या शेंडा, पांढरी, सालेकसाच्या कावराबांध, दरेकसा व बिजेपार असे १३ ‘माहेर घर’ आहेत. या माहेर घरातील ७३३ आदिवासी महिलांची सन २०१६-१७ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली आहे. यापैकी ३६३ महिलांनी ‘माहेर घर’ योजनेचा लाभ घेतला आहे. मार्च महिन्यात ३९ महिलांची आरोग्य संस्थेत प्रसूती झाली. यात ४१ महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘माहेर घर’ योजनेच्या लाभार्थी महिलेला प्रसूतीच्या दोन-तीन दिवसापूर्वी माहेर घरात दाखल केले जाते. त्यांना सर्व सोयी सुविधा असलेले स्वतंत्र कक्ष देण्यात येते. गर्भवती मातेला दैनिक २०० रूपये दराने प्रत्येक दिवसाची बुडीत मजूरी दिली जाते. त्यांच्या जवेणाची सोय बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी बचत गटाला प्रत्येक लाभार्थ्याच्या मागे २०० रूपये दिले जातात. जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. अश्या स्थितीत गर्भवतींना जोखीमेपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षीत प्रसूतीसाठी ‘माहेर घर’ योजना उत्तम आहे. बाल व माता मृत्यू थांबविण्यासाठी ही योजना आहे. गर्भवती बरोबर एका नातेवाईकाचीही सोय या ठिकाणी केली जाते. आदिवासी महिलांनी याचा लाभ घ्यावे. अर्चना वानखेडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (राष्ट्रीय आरोग्य अभियान), गोंदिया.