शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यातील दिग्गजांना पराभवाची धूळ ; आघाडी व अपक्ष उमेदवारांवर मतदारांनी उधळली विजयाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ६६६ मतांनी पराभव करुन या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याचा इतिहास रचला.

ठळक मुद्देदहा वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुनीत उघडले खातेअपक्ष उमेदवाराच्या विजयाने गोंदिया मतदारसंघात रचला इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आश्चर्यकारक निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. गुरूवारी (दि.२४) जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निकालानंतर खरा ठरला. या निवडणुकीत मतदारांनी दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ दाखविली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व अपक्ष उमेदवारांवर मतपेटीतून विश्वास टाकीत त्यांच्यावर विजयाची फुले उधळली.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघापैकी आमगाव,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत तिरोडा मतदारसंघ वगळता भाजपला तीन मतदारसंघात दारुन पराभव पत्थकारावा लागला. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत अति आत्मविश्वास आणि आयारामांना दिलेली संधी भोवल्याची चर्चा निकालानंतर मतदारांमध्ये होती. तिरोडा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले यांनी ७५ हजार ७७३ मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे यांचा २५ हजार ५०८ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप बन्सोड यांनी ३३ हजार मते घेत विजय रहांगडाले यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे ते या मतदारसंघात जार्इंट किलर ठरले.संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ६६६ मतांनी पराभव करुन या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याचा इतिहास रचला. तर काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानी होता. यापूर्वी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव करीत त्यांची विजयाची हॅट्रिक रोखली. आघाडीमुळे या मतदारसंघात मतांचे विभाजन टळल्याने चंद्रिकापुरे यांचा विजयाचा मार्ग सुकर केला.आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे विद्यमान आ. संजय पुराम यांचा ७ हजार ३३५ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत सहषराम कोरोटे आणि संजय पुराम यांच्यात चांगलीच चूरस झाली. त्यामुळे कधी पुराम पुढे तर कधी कोरोटे मागे असा सामना रंगला होता. अखेर कोरोटे यांनी ७ हजार ३३५ मतांनी पुराम यांचा पराभव करुन विजय मिळविला. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार रामरतन राऊत यांचा प्रभाव दिसला नाही.हॅट्ट्रिक आणि इतिहासाची हुलकावणीगोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात होते. ते निवडून आले असते तर सलग चौथ्यांदा निवडून येत इतिहास स्थापन करण्याची संधी होती.मात्र अपक्ष उमेदवारामुळे ते स्वप्न भंगले.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी सामाजिक न्यायमंत्री हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी विजय संपादन करीत बडोले राजकुमार बडोले यांचे विजयाची हॅट्रिक रोखत या मतदारसंघात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले.ईव्हीएमचे लॉक न उघडल्याने समस्याअर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना पाचव्या फेरीत एका ईव्हीएम मशिनचे लॉक उघडले नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्हीव्हीटी पॅटच्या पावत्या मोजणी करण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली. बॅलेट पेपरच्या मतमोजणीने सुरूवात झाली. यात सुरुवातीला ज्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तीच आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती.दोन मतदारसंघात अंतिम फेरीपर्यंत चूरसआमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अंतीम फेरीपर्यंत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये चूरस पाहयला मिळाली. आमगाव मतदारसंघात कधी काँग्रेसचे सहषराम कोरोटे पुढे तर कधी भाजपचे संजय पुराम पुढे होते. मात्र यात अखेर सहषराम कोरोटे यांनी बाजी मारली.गोंदिया विधानसभा मतदारसंघात हा मतदारसंघ अस्तीत्वात आल्यापासून अपक्ष उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यंदा अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी विजय मिळवित या मतदारसंघात नवा इतिहास रचला.

टॅग्स :gondiya-acगोंदिया