शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली.

ठळक मुद्देअंतिम दिनी ११२ अर्ज दाखल : सोमवारी होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीच्या रिंगणात ७६ उमेदवार आहेत. मात्र सोमवारपर्यंत (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सोमवारीच निवडणुकीच्या रिंगणातील लढवय्यांचा खरा आकडा स्पष्ट होणार आहे.राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली. शुक्रवारी जिह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले.विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २१ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज, (६४) तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज, (६५) गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांनी ४३ उमेदवारी अर्ज तर (६६) आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील राजकारणाचा गड असलेल्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २७ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढण्याची आपली इच्छा जाहीर करणाऱ्यांचा हा आकडा आहे. मात्र आता सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतर रिंगणात लढविणार खरा आकडा पुढे येणार.बंडखोरांनी वाढविले टेंशनपक्षांकडून तिकीट नाकारण्यात आल्याने काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी अन्य पक्षांचा हात धरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशा बंडखोरांची संख्या वाढली असून राजकीय पक्षाच्या तिकीटवर लढत असलेल्या उमेदवारांचे टेंशन वाढविले आहे. हे बंडखोर रिंगणात राहिल्यास मत कापून फटका बसविणार असल्याने आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रकार घडणार आहेत.यासाठी त्यांना प्रलोभन देऊन त्यांचे मन वळविण्यात येणार यात शंका नाही.

टॅग्स :gondiya-acगोंडिया