शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; चार मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश शिवहरे यांनी एबीफार्म न जोडल्यामुळे तर पंकज यादव यांनी हमीपत्र न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देपाच उमेदवारांचे नामाकंन रद्द : आता माघारीकडे लागले लक्ष। सोमवारनंतर होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची शनिवारी (दि.५) छाननी करण्यात आली.यात जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण पाच अर्ज त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केले. त्यामुळे आता रिंगणात ७१ उमेदवार असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी किती उमेदवार माघार घेतात.यानंतरच चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश शिवहरे यांनी एबीफार्म न जोडल्यामुळे तर पंकज यादव यांनी हमीपत्र न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे व्यकंट रेवचंद खोब्रागडे यांनी पक्षाचा एबीफार्म न जोडल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. तिरोडा मतदारसंघातून कैलाश गजभिये यांच्या अर्जावर सूचकाने स्वाक्षरी केली नसल्यामुळे तर काँग्रेसचे राधेलाल पटले यांनी पक्षाचा एबीफार्म न जोडल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७६ उमेदवारांनी १२२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र आता यातील ५ उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात असून यापैकी किती उमेदवार माघार घेतात त्यानंतरच या चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात २०, तिरोडा १६, गोंदिया २५ आणि आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवार रिंगणात आहेत.आता लक्ष त्यांच्याकडेशनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यात पाचही मतदारसंघातून ५ अर्ज रद्द झाले. त्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षांच्या नेत्यांना कितपत यश येत आणि किती उमेदवार माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे.मंगळवारपासून मतदार बंधूनोसोमवारी उमेदवारी अर्ज मागे आणि त्यानंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मात्र सोमवारीच चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने अधिकृत पक्षाचे उमेदवार मंगळवारपासून प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून मतदार बंधूनो हे शब्द ऐकायला मिळणार आहे.प्रचारासाठी मिळणार १३ दिवसनिवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. तर ७ आॅक्टोबरनंतर उमेदवारीची सर्व प्रक्रिया संपणार आहे. तर मतदानापूर्वी दोन दिवस आधीच उमेदवारांना जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना १३ दिवसांचा कालावधी मिळणार असून याच कालावधीत त्यांना मतदारांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करावे लागणार आहे.मोठ्या नेत्यांच्या संभाकडे लक्षमागील निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथे सभा घेतली होती. तर या वेळी या चारही मतदारसंघात कोणत्या मोठ्या नेत्यांचा सभा होतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंडिया