भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:41 AM2024-04-16T05:41:15+5:302024-04-16T05:41:49+5:30

नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ ही वाघीण सोडण्यात आली होती.

lost 'she' tigress is finally found; Search success | भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी  

भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी  

लोकमत न्यूज नेटवर्क, गोंदिया : नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ ही वाघीण सोडण्यात आली होती. मात्र ती १३ एप्रिलला भरकटली होती. तिला लावलेला कॉलर आयडीसुद्धा  निघून पडला होता. 

त्यामुळे या वाघिणीचे लोकेशन कळत नव्हते. व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्र अधिकारी यांनी शोधमाेहीम राबविली. त्यानंतर ही वाघीण सोमवारी या क्षेत्रात आढळली. त्यानंतर तिला पुन्हा कॉलर आयडी लावून याच क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले. सोमवारी सकाळी ९:३० वाजता तिला ट्राक्युलाइज करून पुन्हा सॅटेलाइट जीपीएस काॅलर आयडी लावून निसर्गमुक्त करण्यात आले.

Web Title: lost 'she' tigress is finally found; Search success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.