शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना कुलूप

By admin | Updated: April 2, 2015 01:14 IST

जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालये मंजूर आहेत. सुसज्ज इमारतींसह त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या.

लोकमत विशेषगोंदिया : जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालये मंजूर आहेत. सुसज्ज इमारतींसह त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या रुग्णालयांसाठी गेल्या तीन वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे तीन आंग्ल व सात आयुर्वेदिक अशी ९ रूग्णालये मागील अडीच ते तीन वर्षात बंद पडली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सात आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयांची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षात हे दवाखाने बंद पडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने सुरू आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)हे दवाखाने पडले बंदगोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदीक रुग्णालये निधीअभावी बंद पडली आहेत. अडक-अर्जुनी तालुक्यातील गिरोला, डोंगरगाव व सुरतोली हे तीन दवाखाने बंद पडलेले आहेत. खोडशिवणी या आयुर्वेदीक दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे.वनविभागाची जबाबदारी?१३ वने याअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आयुर्वेदीक दवाखान्यांना चालविण्यासाठी वर्षाकाठी एक कोटी रूपयांचा खर्च येतो. हा खर्च करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. परंतू त्यांच्याकडून निधी मिळत नाही. जिल्हा परिषदेने हा निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे दवाखाने बंद पडल्याचे सांगितले जाते.५१ डॉक्टरांची नियुक्तीजिल्ह्यातील आयुर्वेदिक दवाखान्यात ५२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५१ डॉक्टर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात २३ डॉक्टर स्थायी तर २८ डॉक्टर अस्थायी आहेत. आयुर्वेदिक दवाखाने बंद पडल्यामुळे त्यांची नियुक्ती अ‍ॅलोपॅथीच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आली आहे.