शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भारनियमनाचा प्रश्न सोडवावा

By admin | Updated: January 25, 2015 23:19 IST

आपण सत्तेत असलो किंवा नसलो तरी ना. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारणाचे काम करीत आहोत. खोटे आश्वासन देणे आमची संस्कृती नाही.

परसवाडा : आपण सत्तेत असलो किंवा नसलो तरी ना. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारणाचे काम करीत आहोत. खोटे आश्वासन देणे आमची संस्कृती नाही. शेतकऱ्यांसमोर भारनियमानाची समस्या उभी आहे. चांगले दिवस येणार, असे सांगून सत्ता मिळविणारे आता भारनियमाबाबत काहीच बोलत नाही. ते सत्तेत नसताना खूप मोर्चे काढून गरजत होते, आता त्यांचा आवाजही येत नाही, असे प्रतिपादन आ. राजेंद्र जैन यांनी केले.गोंदिया जि.प. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांतर्गत तिरोडा तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बेरडीपार येथे पार पडले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून अदानी पॉवरचे महाव्यवस्थापक शाहू, नगराध्यक्ष गौर, पं.स. सभापती ललिता जांभूळकर, टुंडीलाल शरणागत, डॉ. अविनाश जायस्वाल, डॉ. सुशील रहांगडाले, सुबोध सिंग, मीना पारधी, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पं.स. चे सर्व पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच प्रकाश ठाकरे, संचालन के.एस. रहांगडाले यांनी तर आभार यू.पी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)