सोनी येथे मिशन इंद्रधनुष्यची सुरूवात

By Admin | Updated: October 15, 2015 02:02 IST2015-10-15T02:02:48+5:302015-10-15T02:02:48+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे बुधवारी मिशन इंद्रधनुष्यचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.

The launch of Mission Rainbow at Sony | सोनी येथे मिशन इंद्रधनुष्यची सुरूवात

सोनी येथे मिशन इंद्रधनुष्यची सुरूवात


गोरेगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे बुधवारी मिशन इंद्रधनुष्यचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे व उद्घाटक म्हणून जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.एस. कळमकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
मिशन इंद्रधनुष्यमध्ये ०-२ वर्षे वयोगटातील मुले व गरोदर माता जे लसीकरणापासून वंचित राहिले, त्यांना लसीकरण करण्याचे आवाहन डॉ. पी.जी. सडमेक यांनी केले. सदर कार्यक्रम चार टप्प्यांमध्ये घेऊन जिल्ह्यातील वंचित राहिलेले संपूर्ण बालक व गरोदर माता यांना लसीकरण करून १०० टक्के साध्य करायचे आहे.
कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सर्व सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी लसीकरणात ०-२ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.जी. सडमेक, आरोग्य सहायक भोंदे, आरोग्य सेविका शहारे, खंडाईत, भेलावे, भुरे, अंबुले, बागळकर, चाचेरे, औषधी निर्माण अधिकारी विनोद पटले, संजय लमर्थ, श्रीवास्तव, ठाकरे, पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The launch of Mission Rainbow at Sony