शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची मशागत अंतिम टप्यात

By admin | Updated: June 8, 2014 23:59 IST

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.

रावणवाडी : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा,   पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. शेतकरी सर्व दु:ख बाजूला सारुन यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू लागला आहे.
येत्या काही वर्षापूर्वीपासून शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत आहे. आज ऋतूप्रमाणे कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने उन्हाळी हंगामात शेतात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. शेतकर्‍यांना निसर्गही साथ देत नसून शासनही शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पुढे ठाकला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निसर्ग रबी पिकासाठी उपयुक्त नसून सुरुवातीच्या काळात अकाली पावसाने दमदार हजेरी लावून पूर्णत: तालुक्यास झोडपून काढले. त्यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले.
रबी पिकासाठी पेरलेले बियाणे पूर्णपणे उगलेच नाही. तर काही पाण्याने हिरावून घेतले. अशाप्रकारे कठीण समस्या येऊनही शेतकर्‍याने शेतीविषयी आस सोडली नाही. तो पुन्हा या भिषण गर्मीच्या चटक्यात शेतात घाम गाळीत आहे. येत्या खरीप हंगामात चांगले पीक हाती लागेल या उद्देशाने शेतकरी शेत कामासाठी लागणारे विविध प्रकारचे औजारे यांची विधीवत पूजा-अर्चना करुन खरीप हंगामासाठी शेतीच्या पूर्ण मशागतीच्या कामाला लागला आहे.
सकाळी ६ वाजतापासून आपल्या घराबाहेर पडलेला हा शेतकरी सायंकाळी ६ वाजतापर्यंंत घरी परत येत नाही. पूर्ण दिवसभर उन्हात भिषण गर्मीचे चटके झेलत शेतीच्या पूर्व मशागतीत मग्न दिसून येत आहे. यंदातरी बर्‍यापैकी उत्पन्न होवून कर्जापासून मुक्तता मिळेल, याच आशेत शेतकरी आहे.  (वार्ताहर)