शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी शहरात चार ते पाच ठिकाणी स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाईन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. तर आरोग्य विषयक तपासणीची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचा अनागोंदी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना शहरातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. गोंदिया-बालाघाट मार्गावरी जिनियस रिसार्ट येथे काही नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. याच क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना सकाळी दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी शहरात चार ते पाच ठिकाणी स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाईन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. तर आरोग्य विषयक तपासणीची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. नगर परिषदेने क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना जेवण आणि नाश्ता देण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. याच कंत्राटदाराच्या माध्यमातून दोन वेळेचे जेवण आणि नाश्ता दिला जातो. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना कंत्राटदाराकडून जेवणाचा पुरवठा करण्यात आला. पण काही नागरिकांच्या जेवणात अळ्या आढळल्या तर काहींच्या जेवणात खडे आढळले. त्यामुळे याप्रकरणाने येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार क्वारंटाईन सेंटर येथे नियुक्त असलेल्या कर्मचाºयाकडे केली. पण त्यांनी सुध्दा ही बाब गांर्भियाने घेतले नाही. त्यामुळे त्यांनी थेट नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना फोन करुन सर्व प्रकार सांगितला. तसेच असे निकृष्ट आणि अळ्यायुक्त जेवणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्याधिकारी चव्हाण यांनी याची दखल घेत क्वारंटाईन सेंटरला भेट देवून जेवणाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जेवणाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराला याप्रकाराबद्दल जाब विचारल्याची माहिती आहे. मात्र या प्रकारामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.क्वारंटाईन सेंटरसंदर्भात यापूर्वीही तक्रारीगोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा येथेच निकृष्ट जेवण पुरवठ्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे या क्वारंटाईन सेंटरमधील सोयी सुविधांमध्ये अद्यापही सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे.कंत्राटदाराला बजावली नोटीसजिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना गोंदिया येथील हलमारे कॅटर्सकडून जेवणाचा पुरवठा केला जातो. त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचा जेवणाचा नियमित पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी प्रथमच असा प्रकार घडला. याप्रकरणी या कंत्राटदाराला नोटीस बजावली असून यापुढे असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यात बजाविण्यात आले असल्याचे न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या