शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

By admin | Updated: January 3, 2015 23:04 IST

नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण

गोंदिया : नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण भागात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे.दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवीन दर लागू केले जातात व दरवर्षी त्यात वाढ होत असते. यंदाही चित्र तेच आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेच्या हद्दीबाहेरील काही भागात हे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. बँका गृहकर्ज देताना आणि खरेदी विक्रीचे व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटीसाठी जमिनीचे सरकारी दर हेच आधार मानतात. त्यामुळे रेडिरेकनरच्या दराचा थेट परिणाम बाजारभावावर होतो. राज्याचा नगर रचना विभाग ३१ डिसेंबरला रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर करतो. त्यानुसार यंदा गोंदिया शहरातील विविध भागातील जमिनीच्या दरात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. सर्वाधिक दर गोंदिया-आमगाव मार्गावर आहेत.जिल्ह्यात गोंदिया शहरातील विविध गट क्रमांकांमधील खुल्या जमिनीचे दर वाढले आहेत. गोंदिया शहरात मुख्य बाजार व परिसरातील भूखंडांपेक्षाही रेल्वे उड्डाण पूल ते जयस्तंभ चौक या भागातील भूखंडांचे दर जास्त आहेत. तर नव्याने विकसित होत असलेल्या बालाघाट मार्गावर मात्र सर्वात कमी जमिनीचे दर आहेत. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून रेडिरेकनरचे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे स्टॅप ड्युटी अधिक द्यावी लागते. त्यामुळे पैसे वाचिवण्यासाठी लोकं ३१ डिसेंबरच्या आधीच जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार पूर्ण करतात. यंदाही असेच चित्र कायम होते. लोकं मोठयÞा संख्येने खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी गर्दी केल्याने संकेतस्थळ जाम झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी )