शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकाने आकारला घरगुती मीटरवर लाखाचा दंड

By admin | Updated: November 11, 2014 22:43 IST

आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज

काचेवानी : आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज चोरीपायी एक लाख आठ हजार रूपये आकारले. रक्कम मंजूर नसल्याने प्रकरण ग्राहक न्यायालयात गेले. तरी तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी व गंगाझरीचे कनिष्ठ अभियंते अमित चवरे रूपये भरण्यासाठी तगादा लावून छळ करीत असल्याचे मनोहर कनोजे यांचा मुलगा मुकेश यांनी लोकमतला सांगितले.प्राप्त माहितीनुसार, सन २०१३ मध्ये विद्युत विभागाच्या भरारी पथकाने घाड घालून मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली. ८२ हजार रूपये वीज चोरीचे आणि ३० हजार रूपये नागपूर पोलीस चार्जचे आकारण्यात आले. मात्र ही आकारणी चुकीची असून, ते कमी करून योग्य आकारणीसाठी कनोजे यांनी तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी व संबंधितांकडे मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी भरणा केले नाही तर अंधारातच रहा, असा पवित्रा घेतला. तसेच कनोज यांचे काहीही न ऐकता विद्युत वितरण कंपनी गड्डीगुदाम व सदर नागपूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी कलम १३५, १३८ वीज कायदा २००३ अन्वये दाखल करून सीआरपीसी कलम १६० अन्वये नोटीस बजावला. बिल मंजूर नसून न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य राहील म्हणून कनोजे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेवून १८ आॅक्टोबर २०१४ रोजी प्रकरण दाखल केले. कनोजे यांनी सांगितले की, बिल भरायला आपला नकार नाही. परंतु बेकायदेशीर आकारणी मान्य नसल्यामुळे आपण न्यायालयात गेलो. आता न्यायालय जे निर्णय देईल त्याचे पालन आपण २४ तासाच्या आत करू, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी आपल्याला तात्पुरते नवीन मीटर मिळावे, यासाठी अर्ज केला होता. परंतु गंगाझरीचे कनिष्ठ अभियंता चवरे हे नाहक त्रास देवून अभद्र व्यवहार करीत असल्याचे कनोजे यांनी सांगितले.तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे मीटर देत नाही. शिवाय आपण घरच्या वस्तू विका आणि सदर रक्कम भरा तेव्हाच मीटर देवू. शिवाय तुम्ही न्यायालयात गेले. त्यामुळे जेव्हा न्यायालय निर्णय देईल, तेव्हाच आम्ही मीटर देवून वीज पुरवठा करू, असे अभियंता चवरे बोलत असल्याचा आरोप कनोजे यांनी केला आहे. (वार्ताहर)