शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू ...

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायाबाबत दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगाव बांध : वन्य हिंस्र प्राण्यांनी शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना ठार मारणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगलप्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वन्यप्राण्यांचा हैदोस बघता वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

महिनाभरात डांबरी रस्त्यांवर खड्डे

आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांना खड्ड्यांत पॅचेस लावले जात आहेत. अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच

सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत. असे असतानाही याच शासनाने रस्ता तथा इमारत बांधकाम, घरकुल बांधकाम मंजूर केले आहेत. रेतीला परवानगीच नाही तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत. सर्रास रेतीची चोरी करून वाहतूक सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने रेतीविक्री होत असल्याने बांधकाम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

देवरी : परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ती एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ती जखमी करीत आहेत.

ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांत वाढ

गोरेगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावांत चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. यामुळे लहान व्यावसायिकांत भीती आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात

गोंदिया : बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यावर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.

तंटामुक्त समितीचे तंट्याकडे झाले दुर्लक्ष

तिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीसरूपात रक्कम दिली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्याकडे दुर्लक्ष आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.

पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता खड्ड्यांत

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता मध्य प्रदेशला जोडणारा एकमेव रस्ता आहे. यंदाच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागांनी रस्त्याची दुरुस्ती केली नाही. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.