शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अरूणनगर स्थानकावर सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 13, 2014 23:57 IST

जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बंगाली निर्वासितांची वस्ती असलेल्या अरूणनगर येथे सन १९८५ पासून रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु या थांब्यावर अनेक सुविधांचा

अरूणनगर : जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बंगाली निर्वासितांची वस्ती असलेल्या अरूणनगर येथे सन १९८५ पासून रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु या थांब्यावर अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे.अरूणनगर रेल्वे स्थानकावरून आसोली, बोरी, एगाव, खामखुरा, इंदोरा आदी अनेक गावातील प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. या स्थानकावरून दररोज जवळपास ३०० ते ४०० प्रवाशी ये-जा करतात. मात्र गोंदिया-बल्लारशहा मार्गावरील या रेल्वे स्थानकाची रेल्वे विभाग उपेक्षा करीत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे या स्थानकात दिसून येते.सदर रेल्वे स्थानकावर १५ बाय २० फुटाच्या प्रवाशी शेडचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या हे शेड दयनिय अवस्थेत आहे. येथील फ्लोरींग व प्लास्टर उखडले आहे. येथे सरपटणारे जीवजंतू नेहमीच आढळतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कधीही धोका उद्भवू शकतो. येथे प्रवाशांच्या सेवेसाठी बेंचेस लावलेले आहेत. तेही आता मोडलेल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे गाडी थांबल्यावर मागील पाच डबे झुडूपी जंगलात असतात. प्लॅटफॉर्मवर प्रकाशाची व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होते. येथील मानवरहित रेल्वे फाटकाजवळ अंडरग्राऊंडचे काम करण्यात आले. मात्र पावसाच्या पाण्याने या अंडरग्राऊंडमध्ये पाच फुटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प पडून तेथून येणे-जाणे करणे बंद झाले आहे. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)