कौशिकच्या मारेकऱ्यांचा कोठडीत मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:26+5:30

सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा न्यायालयाने वाढ केली आहे. त्या तिघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

Kaushik's killers stayed in custody | कौशिकच्या मारेकऱ्यांचा कोठडीत मुक्काम वाढला

कौशिकच्या मारेकऱ्यांचा कोठडीत मुक्काम वाढला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा न्यायालयाने वाढ केली आहे. त्या तिघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  
गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली. आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली होती. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२) रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले होते. मागील तीन महिन्यापासून २ लाख २० हजार रूपये टप्याटप्याने आरोपी बनकरला देण्यात आले होते. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. 
या प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला नसल्याने न्यायालयाने त्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे करीत आहेत.

 

Web Title: Kaushik's killers stayed in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.