शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळीच्या धडकेत महिला ठार

By admin | Updated: November 1, 2015 02:12 IST

सालेकसा-आमगाव मार्गावर सालेकसापासून दोन कि.मी. अंतरावर रोंढा या गावाजवळ रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या महिलेला काळी-पिवळीने धडक दिल्यामुळे तिचा घटनास्थळी मृत्यू झाला.

सालेकसा : सालेकसा-आमगाव मार्गावर सालेकसापासून दोन कि.मी. अंतरावर रोंढा या गावाजवळ रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या महिलेला काळी-पिवळीने धडक दिल्यामुळे तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दि.३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे काळी-पिवळी यमदुत बनून आल्याचे पुन्हा सिद्ध झाले.सालेकसा तालुक्यातील सर्व गावे हागणदारीे मुक्त झाले तरी काही गावे फक्त कागदावरच हागणदारीमुक्त असून अनेकांच्या घरी शौचालयाची सोय नाही. रोंढा या गावातसुद्धा अनेकांच्या घरी शौचालये नसल्यामुळे घरातील लोक बाहेर जातात. विशेष करुन महिलांना सायंकाळी अंधार पडल्यावर शौचासाठी जाण्याची सवय असते. या सवयीला अनुसरुन रोंढा या गावातील महिला कलावती भुरकलाल शंभरवार (४८) ही सायंकाळी ७.३० वाजता गावाबाहेर सालेकसा-आमगाव मुख्य मार्गावर शौचास गेली. एवढ्यात सालेकसाकडून आमगावकडे जात असलेली काळी-पिवळी (एम.एच.३१/ए.पी.८७०२) सुसाट वेगाने जात असताना वळणावर शौचास बसलेल्या महिलेला धडक दिली. या धडकेत कलावतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गावर काळी-पिवळीमुळे अनेक अपघात घडून सुद्धा काळी-पिवळी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवितात. या मार्गावर गावानजीक कुठेही गतीरोधक नसल्याने वाहनांची गती नियंत्रणाबाहेर असते. याचाच परिणामामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. बातमी लिहीपर्यंत चालक पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. या घटनेमुळे गावातील लोक खूपच संतापले. (तालुका प्रतिनिधी)