शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातील तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडताच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आवश्यक दक्षता ...

ठळक मुद्देव्यापारी संघाचा निर्णय : प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटींचे पालन होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडताच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आवश्यक दक्षता घेऊन कोरोनाशी लढण्यासाठी शहरवासीयांनी कंबर कसली आहे. यासाठी आठवड्यातील ४ दिवस बाजारपेठ सुरु ठेवणे आणि ३ दिवस ‘जनता कर्फ्यू’ लावणे असा निर्णय येथील व्यापारी संघ, वरिष्ठ नागरिक गण आणि काही प्रशासनिक अधिकाऱ्यांनी मिळून घेतला आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत शहरवासी सतर्क झाले असून नुकताच त्यांनी शनिवार व रविवार असे २ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ घोषीत केला. त्यानंतर पुन्हा १ दिवस म्हणजे सोमवारपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविला व यानंतर आठवड्यातून ३ दिवस म्हणजे दर शनिवार, रविवार आणि सोमवारी ‘लॉकडाऊन’सह ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय घेतला. या ३ दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान नगर पंचायत हद्दीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद राहणार असून शहरवासी विनाकारण घराबाहेर पडणार नाही.मेडीकल स्टोर्स दवाखाना व जीवनावश्यक वस्तुंसाठीच बाहेर पडणार असून या नियमाचा भंग केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच शासनाने लागू केलेल्या नियमांचे सुद्धा कठोरतेने पालन केले जाईल असाही निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील जेष्ठ व्यापारी दौलत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकीत ठाणेदार राजकुमार डुणगे, व्यापारी राजू जैन, विनोद जैन, लखन अग्रवाल, भोजराज टेंभरे, सुरेंद्र असाटी, ओम अग्रवाल, सुनील असाटी, आशू असाटी, राजकुमार रोकडे, लखेंद्र शाह, आनंद पटले, संतोष उजवणे, चीनू भाटीया, राजेंद्र बागडे, महेश असाटी, निश्चल जैन फिजिकल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या ४ दिवसांत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दुकाने सुरु राहतील. याशिवाय जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटीव शर्तींचे कठोरपणे पालन केले जाईल सूर एकमताने निघाला.१५ जून पर्यंत प्रयोगाचा पहिला टप्पाशहराला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शहरातील व्यापारी, वरिष्ठ नागरिक व प्रशासनिक अधिकाºयांनी एकत्र येत घेतलेला ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरिही हा प्रयोग येत्या १५ जूनपर्यंत चालविला जाणार आहे. त्यानंतर परिस्थिती बघून पुन्हा या विषयावर चर्चा करुन पुढे निर्णय घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार