शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील सिंचन विहिरी दोन वर्षांपासून कागदावरच

By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST

शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही.

शेंडा/कोयलारी : शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही. सडक/अर्जुनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षापासून सात विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी एकही विहीरीचे बांधकाम करण्यात आले नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहेत. याची शहानिशा सदर प्रतिनिधीने केली असता ग्रामविस्तार अधिकारी हटवार व खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी केली असता त्या दोघांनीही रेशोची समस्या सांगीतली. शेतकर्‍यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शेतात विहीरीचे बांधकाम करण्यात येते. परंतु त्या विहीरीच्या बांधकामासाठी शेतकर्‍यांना हेलपाट्या खाव्या लागतात.  सडक/अर्जुनी ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी हटवार यांनी सांगितले की, आमच्याकडे सात विहिरी मंजूर आहेत. परंतु विहीर बांधकाम करण्यासाठी कुशल व अकुशल कामावर ४0 ते ६0 असा रेशो आहे. त्यासाठी ग्रामपंचायतला आपल्या स्तरावर किमान २0 लाखाचे माती काम करावे लागेल तरच फक्त एका विहिरीचे बांधकाम होईल अन्यथा होणार नाही. वस्तुस्थिती जावून घेण्याकरीता सदर प्रतिनिधीने खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी भेट घेतली असता ते म्हणाले की, अगोदर पंचायत समिती स्तरावर कामे करण्यात येत होती. त्यामुळे विहिर बांधकाम होत होते. परंतु आता ग्रामपंचायत स्तरावर काम केले जाते. त्यामुळे विहिर बांधकाम रखडले. शासन शेतकर्‍यांना विहिरी मंजूर केल्याचा गवगवा करून शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहे. शेतकर्‍यांना  वाटेल तेवढे पुरावे मागितले जातात. आपल्याला विहीर मंजूर होईल. या आशेने दक्षिणा देण्यास तयार होतो. परंतु त्याच्या पदरी निराशाच पडते. शेतकर्‍यांना विहिरीची आवश्यकता आहे. रेशोची नाही, असे शेतकरी दोन वर्षापासून बोलत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या विहिरींना रेशोच्या कचाट्यातून दूर सारुन विहीर बांधकाम करून देण्याची मागणी सडक/अर्जुनी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)