शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यातील घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले

By admin | Updated: September 16, 2014 23:49 IST

दोन वर्षापूर्वीपर्यंत सतत वाढतीवर असणाऱ्या आणि क्वचितच थोडे दर उतरून काही दिवसातच पुन्हा उसंडी घेणाऱ्या सोन्याची झळाळी गेल्या दोन वर्षात मात्र चांगलीच कमी झाली आहे.

गोंदिया : दोन वर्षापूर्वीपर्यंत सतत वाढतीवर असणाऱ्या आणि क्वचितच थोडे दर उतरून काही दिवसातच पुन्हा उसंडी घेणाऱ्या सोन्याची झळाळी गेल्या दोन वर्षात मात्र चांगलीच कमी झाली आहे. अलिकडच्या काही दिवसात दर चढण्याऐवजी ते कमी होत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे लोक धास्तावले आहेत. त्यामुळे सध्या गोंदियाच्या सुवर्ण बाजारातही खरेदीला उठाव नसल्याचे दिसून येते.दोन वर्षापूर्वी ३१ हजारांवर गेलेला सोन्याचा दर आता २७ हजार ४०० वर घसरला आहे. गेल्या पाच मिहन्यांत अडीच हजारांनी सोन्याचे दर घसरले. दररोज सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक चढतीवर असल्याने दिवाळीपर्यंत सोने आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सुरिक्षत गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार नेहमीच केला जातो. गेल्या १५ वर्षातील सोन्याच्या दरावर एक नजर टाकली असता हे दर कितीतरी पटींनी वाढले आहेत. सततत चढतीवर असणाऱ्या सोन्याच्या दरामुळे अनेकांनी सोन्यात गुंतवणूक केली. परंतू दोन वर्षांपासून सोन्याचे दर सतत अस्थिर आहेत. ३१ ते ३१ हजार ५०० रुपये प्रति तोळा गेलेले सोन्याचे दर आता २७ हजाराच्या घरात पोहोचल्याने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी आता हात आखडता घेतला आहे. सोन्यातील ही घसरण जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत समजले जातात. त्यामुळे सोने ही एक सुरिक्षत ठेव समजून त्यात गुंतवणूक करताना आता सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या टप्प्यात असल्याने भाव आणखी कमी होऊ शकतात, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)