शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

एकात्म मानवतावादानेच राष्ट्रविकास शक्य

By admin | Updated: December 15, 2015 03:59 IST

या देशात सर्व धर्म पंथांचे लोक राहतात. भाषा व वेशभूषा जरी वेगवेगळी असली तरी विविधतेतून एकतेची संकल्पना

देवरी : या देशात सर्व धर्म पंथांचे लोक राहतात. भाषा व वेशभूषा जरी वेगवेगळी असली तरी विविधतेतून एकतेची संकल्पना दिसून येते. देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस व सहकाऱ्यांची सत्ता होती. इतिहास बघता सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना व एकात्म मानववाद जर समजून घेतला असता तर राष्ट्राचा विकास झाला असता, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना व्यक्त केले. देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात गुरूवारी पं. दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी आमगाव विधानसभा क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेतील समारोपीय सत्रात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर मंचावर उपस्थित होते. एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने आ. संजय पुराम, सुरेश मालगावे, राकेश शमार, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, सरिता रहांगडाले, सभापती देवकी मरई, सविता पुराम उपस्थित होते. केशवराव मानकर यांनी संघटना मजबूत करायची असेल तर निवडणूक जिंकायला पाहिजे. लढाई जिंकण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहायला हवे, असे आवाहन केले. तर आ. संजय पुराम यांनी, कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याची गरज असून त्यामुळे कार्यकर्ता परिपक्व होतो, असे सांगितले. वक्ता डॉ. प्रकाश मालगावे यांनी संघटन व कार्यपध्दती या विषयावर मार्गदर्शन केले. भाजपा इतिहास व विकास यावर जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी प्रकाश टाकला. राजेश बांते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना समजावून सांगितल्या. अनिल जोशी यांनी विचार, परिवार आणि संकल्पना या विषयावर माहिती दिली. केशवराव मानकर यांनी संघटन या विषयावर माहिती दिली. तर सोशल मीडिया व व्यवस्थापन मीडियाचे समाजातील महत्त्व जयंत शुक्ला यांनी समजावून सांगितले. प्रास्ताविक सुभाष आकरे यांनी तर संचालन लक्ष्मण सोनसर्वे यांनी केले. एक दिवशीय प्रशिक्षण शिबिरासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.प्रशिक्षण वर्गात आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमगाव, सालेकसा, देवरी मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)