शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय असून येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने नागपूर येथील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात होते.

ठळक मुद्देमशिनचे काच फुटल्याने समस्या । हैद्राबादवरुन मागविले काच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात आली. यासाठी सिंगापूरहून मशिन देखील मागविण्यात आली. या मशिनचे तज्ज्ञांकडून शुक्रवारी इन्स्ट्रालेशन सुध्दा झाले. मात्र स्वॅब नमुने तपासणी करण्याच्या मशिनचे काच फुटले असल्याने आता गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया पुन्हा चार ते पाच दिवस लांबणीवर गेली आहे.गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय असून येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने नागपूर येथील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात होते. तर नागपूर येथील दोन्ही प्रयोगशाळेत संपूर्ण विदर्भातील स्वॅब नमुने तपासणीसाठी येत असल्याने त्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. परिणामी रुग्णांवर त्वरीत उपचार सुरू करण्यास अडचण होत होती. ही बाब लक्षात घेत शासनाने गोंदिया येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. यासाठी सिंगापूर येथून मशिन देखील मागविण्यात आली. ही मशिन दहा दिवसांपूर्वी गोंदिया येथे दाखल झाली. यानंतर शुक्रवारी (दि.२९) या मशिनचे इन्स्ट्रॉलेशन करण्यासाठी ही मशिन उघडण्यात आली. मात्र ज्या मशिनवर स्वॅब नमुने तपासणी केले जातात त्याच मशिनचे काच फुटलेले आढळले. वाहतुकी दरम्यान या मशिनचे काच फुटले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळ येथील देखील याच मशिनचे काच फुटलेले आढळले. त्यामुळे इन्स्ट्रॉलेशन करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांनी इतर मशिनचे काम पूर्ण केले. केवळ नमुने तपासणीची मशिन काच फुटले असल्याने सुरू झाली नाही. त्यानंतर हैद्राबाद येथून या मशिनचे काच मागविण्यात आले आहे. मात्र ते काच येण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. काच आल्यानंतर लगेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१) सुरू होणारी स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे.पुन्हा आठवडाभर नागपूरच्या भरोश्यावरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री देखील दाखल झाली आहे. मात्र स्वॅब नमुने तपासणी करणाऱ्या मशिनचे काच फुटले असल्याने नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू करता येणार नाही. त्यामुळे पुन्हा आठवडाभर स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या