शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तंमुसच्या पुढाकाराने प्रेमीयुगूल विवाहबंधनात

By admin | Updated: February 9, 2016 01:34 IST

चापटी गावातील दोन प्रेमीयुगुलांच्या वैवाहिक कार्याला जन्मदात्या आई-वडिलांचा होणारा विरोध लक्षात घेता ...

बोंडगावदेवी : चापटी गावातील दोन प्रेमीयुगुलांच्या वैवाहिक कार्याला जन्मदात्या आई-वडिलांचा होणारा विरोध लक्षात घेता चापटी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने ‘त्या’ प्रेमवीरांना लग्नाच्या बेडीत बांधून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्याचे कार्य केले. चापटी येथील दोन्ही प्रेमीयुगूल सज्ञान असून त्यांनी आपल्या प्रेमावर विजय मिळविल्याचे स्पष्ट केले. अरविंद श्रीकृष्ण जुमनाके असे प्रेमवीराचे तर वैशाली कुंभरे असे प्रेयसीचे नाव आहे. दोघेही एकाच गावातील असून सजातीय आहेत. मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेम बहरले होते. दोघांचे वास्तव्य गावातच असल्याने भविष्यात आपण एकमेकांपासून अलिप्त राहणार नाही, अशी खूणगाढ त्या दोघांनी मनाशी पक्की करून घेतली. येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्यांच्या भेटीगाठीचे नित्यक्रम झाल्याने पुढील आयुष्यात आपण समाजात पती-पत्नी म्हणून वावरू, असे ते स्वप्न रंगवू लागले. या प्रेमीयुगुलांची माहिती आई-वडिलांना झाल्याने त्यांनी त्यांच्या प्रेमविवाहास नकार दिला. त्या दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करला, परंतु एकमेकांपासून अलग राहणार नाही, अशी प्रतीज्ञा केल्याने अखेर आई-वडिलांचे प्रयत्न निष्फळ ठरले. लोकांच्या नजरेआड असे किती दिवस काढायचे, याचा सारासार विचार करून अखेर त्या प्रेमीयुगुलाने गावातील तंटामुक्त समितीकडे आपली कैफीयत मांडून लग्न लावून देण्याची विनंती केली. गावच्या प्रेमीयुगुलांचा आलेला अर्ज पाहून तंमुसने प्रेमीयुगुलांच्या आई-वडिलांना सभेत बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची खात्री झाल्याने हिंदू विवाह पध्दतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला. गेल्या काही वर्षापासून प्रेमात पडलेल्या त्या प्रेमीयुगुलांना गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तथा आशीर्वादाने विवाह बंधनात अडकवून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्यात आले. विवाहाप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंता परसमोडे, निमंत्रक तथा पोलीस पाटील टिकाराम बन्सोड, सरपंच जागेश्वर कोरे, माजी जि.प. सदस्य मधुकर मरस्कोल्हे तसेच गावातील महिला-पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. (वार्ताहर)