शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगो एअरलाईन्सला झटका

By admin | Updated: February 9, 2016 01:33 IST

गोवा टूर अरेंज्ड करणाऱ्या ११ लोकांनी टूरचे पैसे भरल्यावर इंडिगो एअरलाईन्सने तिकीट रद्द केली.

ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ६१ हजार नऊ टक्के व्याजाने देण्याचे आदेशगोंदिया : गोवा टूर अरेंज्ड करणाऱ्या ११ लोकांनी टूरचे पैसे भरल्यावर इंडिगो एअरलाईन्सने तिकीट रद्द केली. मात्र टूरपोटी भरलेले ६१ हजार रूपये परत न करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच झटका दिला. न्यायमंचाने नऊ टक्के व्याजाने ६१ हजार ६०० रूपये, त्रासापोटी १५ हजार रूपये तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये तक्रारकर्त्याला द्यावे, असा आदेश पारित केला.निखिल आनंदराव भांडारकर रा. रामनगर (गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तर विरूद्ध पक्षामध्ये विक्रांत देशमुख (बिझनेस मॅनेजर, इंडिगो एअर लाईन्स, नागपूर), इंडिगो एअर लाईन्स, जनरल मॅनेजर (इंडिगोर एअरलाईन्स, गुरगाव, हरियाणा) व रमनितसिंग चावला रा. रामनगर, बाजार चौक, गोंदिया यांचा समावेश आहे. निखिल भांडारकर व त्यांच्या मित्रांनी गोवा येथे जाण्यासाठी टूर अरेंज्ड केला होता. त्यासाठी विरूद्ध पक्षाला ६१ हजार रूपये देवून विमानाचे तिकीट घेण्यात आले. नेट बँकींग प्रक्रियेने आयसीआयसीआय बँकेचे खाते क्रमांक, इंटर ग्लोबल एव्हिएशन लि. नावावर रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर सदर विमानाचे तिकीट रद्द झाल्याचे तक्रारकर्ते भांडारकर यांना कळले. त्यामुळे त्यांनी पुन्हा १३ सप्टेंबर २०१४ ला गोवा जाण्यासाठी टूर अरेंज्ड केला. या वेळी टूरवरून परतल्यावर त्यांनी मागे रद्द झालेल्या तिकिटांची रक्कम ६१ हजार रूपयांची सदर कंपनीकडून मागणी केली. मात्र त्यांना रक्कम परत करण्यात आली नाही. यासाठी इंडिगो एअर लाईन्सचे बिझनेस मॅनेजर देशमुख संपूर्ण जबाबदार आहेत. मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकत विरूद्ध पक्षातील जनरल मॅनेजर व रमनितसिंग चावला यांना रक्कम पाठविल्याचे सांगितले. तर चावला यांनी कुणाकडूनही रक्कम प्राप्त न झाल्याचे सांगितले. या टोलवाटोलवीमुळे भांडारकर यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली व ८६ हजार ६०० रूपये तसेच १० हजार रूपयांच्या व्याजासाठी दावा केला. शिवाय व्यवहार झाल्याचे सर्व दस्तऐवज प्रकरणात दाखल केले. न्यायमंचाकडून इंडिगो एअरलाईन्सला नोटिस पाठविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून कुणीही उपस्थित झाले नाही व त्यांनी आपले उत्तरही दाखल केले नाही. त्यामुळे न्यायमंचाने एकतर्फी आदेश पारित केला.तक्रारकर्ते भांडारकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व सर्व दस्तऐवजांची तपासणी करीत कारणमिमांसा केली व त्यांची तक्रार अंशत: मान्य केली. विरूद्ध पक्षाने भांडारकर यांना ६१ हजार ६०० रूपये परत करावे. तसेच प्रकरण दाखल झाल्याच्या तारखेपासून सदर रकमेवर नऊ टक्के व्याज, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल १५ हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये मंजूर करण्यात आला. तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी ३० दिवसांच्या आत करण्यात यावी असा आदेश दिला.सदर आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वामन व्ही. चौधरी यांनी पारित केला. (प्रतिनिधी)