पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:58+5:30

तिरोडा नगर परिषदेने लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर गांर्भियाने विचार करित पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Indication of lockdown again | पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात तिरोडा आणि गोंदियाचा समावेश : रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील १५ दिवसांपासून तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. तिरोडा नगर परिषदेने लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर गांर्भियाने विचार करित पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. बुधवारपासून (दि.१५) या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिले आहे.
दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात २५ जूनला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधित रुग्णांचे व्दिशतक पूर्ण झाले आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात आढळले आहे. तर तिरोडा तालुक्यात आणि स्थानिकांमध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आतापर्यंत ७-८ कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे.
विदेशातून परतणाºया नागरिकांमध्ये सर्वाधिक तिरोडा तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. याच तालुक्यातील अद्यापही ५० हून अधिक जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. सोमवारी (दि.१३) आढळलेल्या एकूण ७ कोरोना बाधित रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील ४ आणि गोंदिया तालुक्यातील १ व गोरेगाव तालुक्यातील ग्राम भडंगा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तिरोडा व गोंदिया तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. याच पार्श्वभुमीवर तिरोडा नगर परिषदेने शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात यावा, यासंबंधिचा प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया येथे सुद्धा लॉकडाऊन करण्याच्या विचारात प्रशासन आहे.
सोमवारी सायंकाळी यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचे मंथन सुरू होते. दरम्यान मंगळवारी (दि.१४) यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या २ तालुक्यांत लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनो नियमांचे काटेकोरपणे करा पालन
कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करणे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असे निर्देश असताना सुद्धा त्याचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. परिणामी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.

स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविणार
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिजोखमीच्या रुग्णांची अधिक काळजी घेतली जात आहे. त्यातच आता स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोना वाढता संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विषयक उपाययोजना राबविण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडल्याची माहिती आहे.

कडक लॉकडाऊन नकोच
मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे जवळपास ३ महिने सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्याने सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा थोडे उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये असा सूर व्यापाऱ्यांमध्ये आहे.

Web Title: Indication of lockdown again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.