पाच दिवसात वाढले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 05:00 AM2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:11+5:30

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्यास सुरूवात झाली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.मागील पाच दिवसात ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ५४१ नवीन बाधितांची भर पडली.

Increased patient recovery rate in five days | पाच दिवसात वाढले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

पाच दिवसात वाढले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

Next
ठळक मुद्दे११७९ बाधितांची कोरोनावर मात : ५४१ नवीन रुग्ण : ८ बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्टोंबरमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर कायम राहणार का अशी चिंता शहरवासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोंबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता दूर झाली आहे. १ ते ५ ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.५४१ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.यानंतर जवळपास पाच महिने कोरोना रुग्ण वाढीचा वेग नियंत्रणात होता. मार्च ते जुलै या पाच महिन्यात २८८ बाधितांची भर पडली तर पाच बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १६ बाधितांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने ५६६९ कोरोना बाधित आणि ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना ससंर्गाच्या अनुषंगाने हे दोन महिने जिल्हावासीयांसाठी घातक ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा ७ हजार पार झाला तर कोरोना बळींचे शतक पूर्ण झाले. मागील दोन महिने सातत्याने रुग्ण वाढीचा आलेख उंचावत असल्याने मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांसह प्रशासनाची काळजी वाढली होती.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्यास सुरूवात झाली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.मागील पाच दिवसात ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ५४१ नवीन बाधितांची भर पडली. तर ८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७२५८ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ५१५२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्टोंबर महिन्यात रुग्ण संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Increased patient recovery rate in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.