शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात शुल्क वाढ; दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील राइस मिलची चाके थांबली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:40 IST

५०० कोटी रुपयांचे नुकसान : हजारो मजुरांचा रोजगार हिरावला, शेतकऱ्यांना फटका

गोंदिया : केंद्र सरकारने उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क तर अरवा तांदळाच्या निर्यातीवर २३ ऑगस्टपासून बंदी घातली आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने २३ सप्टेंबरपासून पूर्व विदर्भातील ६७५ मिल बंद पडल्या असून यावरून अवलंबून असणाऱ्या ५० हजारांपेक्षा जास्त मजुरांचा रोजगारसुद्धा हिरावला आहे.

मागील दोन महिन्यांपासून शासनाने यावर कसलाच ताेडगा न काढल्याने राइस मिल उद्योग डबघाईस आला असून हीच स्थिती राहिल्यास याचा शेतकऱ्यांनासुध्दा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतल्या जाते. त्यामुळे यावर आधारित राइस मिल उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगातून ६० हजारावर मजुरांना रोजगार मिळतो. तर पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात चांगल्या तांदळाची विदेशात निर्यात केली जाते. यात उष्णा तांदूळ (बायल राइस) अरवा तांदूळ (साधा तांदूळ) मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.

पूर्व विदर्भात ६७५ राइस मिल असून यातून धानाची भरडाई करून तो देश-विदेशात पाठविला जातो. यामुळे धानालासुद्धा चांगला दर मिळण्यास मदत होते. पण केंद्र सरकारने २३ ऑगस्टपासून अरवा तांदळावर निर्यात बंदी तर उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क केले. परिणामी तांदळाची निर्यात थांबली आहे. परिणामी १५ सप्टेंबरपासून धान भरडाई बंद आहे. निर्यात शुल्क रद्द करून तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याची मागणी विदर्भ राइस मिल असोसिएशन केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. पण त्यांनी मागील दोन महिन्यांपासून यावर कुठलाही तोडगा न काढल्याने पूर्व विदर्भातील राइस मिलची चाके थांबली आहेत. परिणामी यावर अवलंबून असणार ६० हजारांवर मजुरांचा रोजगार सुद्धा हिरावला आहे.

धानाच्या दरावर होणार परिणाम

केंद्र सरकारने अरवा तांदळावर निर्यात बंदी आणि उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यापूर्वी खुल्या बाजारपेठेत धानाला २४०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनासुध्दा चांगला दर मिळण्यास मदत होत होती. पण ऐन खरीप हंगामातील धानाची आवक सुरू झाली असताना केंद्र सरकारच्या धोरणामुळे धानाचे भाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तर राइस मिल उद्योग डबघाईस

केंद्र सरकारच्या राइस मिल विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यांपासून धानाची भरडाई बंद असल्याने ज़वळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर यावर अवलंबून असणाऱ्या ६० हजारांवर मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने तांदळावरील निर्यात बंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क कमी न केल्यास पूर्व विदर्भातील राइस मिल उद्योग पूर्णपणे डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विदर्भ राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रPaddyभातFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया