शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:53 IST

शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ : अर्जूनी मोरगाव तालुक्यातील चित्र

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : शासन शिक्षणविषयक कितीही कायदे करीत असले तरी राज्यात सर्वत्र शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. एक तर कोरोनाकाळात शिक्षण गमावलं. आता शासनाच्या नियोजनशून्य निर्णयाची सामान्य जनता बळी ठरत आहे. एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच वर्ग आणि एक शिक्षक असलेल्या तब्बल १८ शाळा आहेत. आता तुम्हीच सांगा राज्यकर्तेहो लेकरांचे भवितव्य घडणार कसे, ओल्या मातीच्या गोळ्याला शिक्षक आकार देणार कसे, आमच्या पाल्यांचे भवितव्य घडणार तरी कसे, असे नानाविध प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केले जात आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे चित्र अत्यंत विदारक आहे. शाळा इमारती आहेत. भौतिक सुविधाही आहेत. शाळा आहेत, पण शिक्षण नाही अशी दैन्यावस्था आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा पार खालावलेला आहे. मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात एका शाळेला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. एक शिक्षक शाळेचा दर्जा सुधारूच शकत नाही असे जळजळीत वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीवनगर, अर्जुनी तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर ही शाळा आहे. लोकसंख्या २५०. मात्र, शाळेची पटसंख्या ४१ आहे. या शाळेत चार वर्गांसाठी केवळ एक शिक्षक कार्यरत आहे. या गावच्या ग्रामस्थांचा अत्याधिक विश्वास जि.प. शाळेवर आहे. गावाची अल्प लोकसंख्या असली तरी त्या तुलनेत पटसंख्या मोठी आहे. हे विश्वासाचेच प्रतीक आहे. दुसरी शाळा आहे महागावची. गावाच्या नावाप्रमाणेच या गावची लोकसंख्या ५४९६ आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या जि.प.शाळेत केवळ २२ पटसंख्या आहे. या गावात तशा आणखी इतर तीन शाळा आहेत. इतर शाळांची पटसंख्या मात्र जि.प.शाळेच्या तुलनेत बऱ्यापैकी आहे. कॉन्व्हेंट संस्कृती की आणखी काही कारण असू शकते. एवढ्या मोठ्या गावच्या शाळेत एक ते पाच वर्गांसाठी केवळ एक शिक्षक शिकवायला असेल तर काय चित्र असणार, किंबहुना अशा गावात शिक्षकांची संख्या वाढवून प्राथमिक शिक्षणाला अधिक उभारी देण्याचे प्रयोग केले पाहिजेत.

वर्ग पाच...शिक्षक एक

तालुक्यात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असलेल्या जि.प. शाळांत एक शिक्षक कार्यरत असलेली १८ गावे आहेत. यात करडगाव बोळदे, राजीवनगर (ताडगाव), जानवा, महागाव, बंध्या, ब्राह्मणटोला, देऊळगाव, बोदरा, कवठा, डोंगरगाव, डोंगरगाव, संजयनगर, पुष्पनगर (अ), चिचटोला,पुष्पनगर (ब), जब्बारखेडा, भसबोळण, खडकी, धमदीटोला व केळवद या शाळांचा समावेश आहे. जानवा येथील शाळेत एकमेव असलेले शिक्षक ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. अशीच स्थिती आणखी काही शाळांची आहे.

किमान दोन शिक्षक हवेत !

प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान दोन शिक्षक हवेत हे शासनानेच धोरण आहे. मात्र, या धोरणाचे श्राद्ध झाल्याचे पदोपदी जाणवते. राजीवनगर येथील शाळेच्या अगदी बाजूलाच विस्तीर्ण तलाव आहे. एखादा विद्यार्थी शिक्षकाची नजर चुकवून गेलाच तर त्याला जबाबदार कोण, बिचाऱ्या शिक्षकाचा दोष नसताना तो व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. याव्यतिरिक्त अध्ययनासोबतच शिक्षकाला शालेय पोषण आहाराची पूर्वव्यवस्था, रेकॉर्ड ऑनलाइन भरणे, माहिती संकलित करून वरिष्ठांना सादर करणे, सर्व वर्गांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे, उपक्रम राबवणे, प्रशासकीय व बँकेची कामे, सभा, प्रशिक्षणाला उपस्थिती अशी अनेक कामे करावी लागतात. तो एकटा शिक्षक ही सारी कामे कशी पार पाडणार, हा यक्षप्रश्न आहे.

अर्धे शिकण्यात, तर अर्धे गोंधळात

वर्ग चार आणि शिक्षक एकच असल्याने चारही वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकाचीसुध्दा तारांबळ उडते. असाच काहीसा अनुभव राजीवनगर येथील शाळेला भेट दिल्यानंतर आला. शिक्षक एका वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी गोंधळ करीत होते, तर काही अभ्यास करीत असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळाTeacherशिक्षकgondiya-acगोंदिया