शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन नुकसानीचे त्वरीत पंचनामे सुरू करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या अधिनस्त येणाऱ्या यंत्रणेला द्यावे असे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे.आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी करुन विक्री करुन दिवाळी साजरी करतात. मात्र दिवाळीपूर्वीच अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा कापणी केलेला धानाला सर्वाधिक फटका बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाले तर काही प्रमाणात सडले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्याचा दौऱ्या दरम्यान अनेक शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. या दरम्यान अवकाळीमुळे धानपिकाचे मोठे नुकान झाल्याची बाब पुढे आली. शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या व्यथा मांडल्या.त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पत्र सुध्दा चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह उद्धव मेंहदळे, इंद्रदास झिलपे, सुभाष देशमुख, चेतन शेंडे, यादोराव भावे, पंढरी वकेकार, तुकाराम मडावी, सर्वेश धांडे, मोरेश्वर भावे, विलास भावे, देवराव रोकडे, सचिन लांजेवार, गोपीचंद कावळे, संतोष कुळमेथे, महादेव शहारे, गोपाल अवराशे उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी