शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 21, 2016 01:54 IST

कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही.

शासन व शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेक : कृषी विभागाला भ्रष्टाचाराचे गालबोटकाचेवानी : कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही. आजघडीला सर्वाधिक मालदार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी दिसून येतात.कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकरी व शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून स्वार्थहित कसा साधला, हे सध्या गोरेगाव कृषी तालुक्यांतर्गत चोपा मंडळ कृषी कार्यालयात बोटे येथे कार्यरत आणि २०१५ मध्ये कामे करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर आलेले एन.एस. ईलमे यांच्या दैनिक कार्यावरुन दिसून येते.माहिती अधिकाराखाली प्राप्त दैनंदिनी कामकाजावरुन कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव शेततळी आणि शासनाला चुकीचे कामे दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. कामाचे दिवस चुकीचे दाखविणे, शेतकऱ्यांसमक्ष कामाच्यापूर्वी व नंतर मोजमाप न करता दाखवणे, गोरेगाव व तिरोड्याचे काम पाहणे, कामे सोडून प्रवास रजा सवलत (एल.टी.सी.) दाखवून शासनाकडून लाभ घेणे, प्रतिनियुक्ती ठिकानातून सतत अनुपस्थित राहणे, चार लाख रुपयांची कामे एकाच दिवशी पूर्ण केल्याचे सांगणे, अशा अनेक बाबी आहेत. त्यावरून कृषी सहायक एन.एस. इलमे यांनी सर्वांशी धोकाधडी करुन फसवणूक केल्याचे दिसून येते.बसबसपुरा येथे १०७-९४ हे.आर.मध्ये १७ लाख २२ हजार ६४३ रुपयांचे काम दाखविण्यात आले आहेत. माहिती अधिकारात अपूर्ण माहिती मिळाली असली तरी अपूर्ण माहितीकरिता राज्य आयोगाला अपिल करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांनी (जी.क्र/उविक्रअ कृसप्रतिनियुक्ती/११३/२०१५ दिनांक २७/१/२०१५) विविध योजनांच्या अल्प प्रगतीचा विचार करता कार्यालयीन व क्षेत्रीय कामे पूर्ण करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी २ मार्च २०१५ ला क्षेत्रीय कामे करण्याकरिता कार्यमुक्त केले. १२ जून २०१५ ला आदेश (क्र.६३३/२०१५) गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी कामाची अडचण पाहता तात्काळ रुजू होण्यास कळविले.कृषी सहायक नाना ईलमे यांनी स्वत:च्या मर्जीने १२ जून २०१५ ला गोरेगाव कार्यालयात रुजू झाले. तिरोड्यातून मोकळे केल्याचे पत्र मात्र घेण्यात आले नाहीत किंवा दिलेल्या माहितीत पत्र दिसून येत नाही. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी १ मार्च ते ३० जून २०१५ पर्यंत दिलेल्या कामकाजाची दैनंदिनीमध्ये भ्रामक माहिती दर्शविण्यात आली आहे. या दैनंदिनीवरुन सर्व कामे खोटे दर्शविण्यात आले असून शेतकरी, विभाग आणि शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)