शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:तील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : स्पर्धा परीक्षेतील गुणवंत व त्यांच्या पालकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : एमपीएससी, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:तील क्षमता, बुद्धी व ऊर्जेचे आत्मपरिक्षण करुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा तेव्हा स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षेतील कर्तृत्ववान यशवंत व त्यांच्या पालकांच्या सत्कार गुरूवारी करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नगर पंचायत उपाध्यक्ष आफताब शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार मंचावर उपस्थित होते. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.स्वत:चा अनुभव सांगत स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरच्या स्वरुपात संवाद साधला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वत:चा यशोप्रभात सांगत असताना त्यांनी अडचणींना सामोरे जाऊन यश कसे प्राप्त झाले याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या निखील संतोष बन्सोड, नितीन राजाराम बरैया या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.माध्यमिक शालांत परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली अनुश्री हेमंत भेंडारकर या विद्यार्थिनीचा सुध्दा या वेळी सत्कार करण्यात आला. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे आवाहन कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एम.मेश्राम यांनी तर आभार सी.यू.उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी हर्षवर्धन मेश्राम, गोपाल चनाप, अरुण मानकर, सितेश ईश्वर, सचिन वासनिक यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी