म्हणे मला नोकरी करायची होती.. २० दिवसांच्या निरागस बाळाचा जन्मदात्या मातेनेच केला खून

By अंकुश गुंडावार | Updated: November 19, 2025 20:32 IST2025-11-19T20:29:18+5:302025-11-19T20:32:28+5:30

म्हणे मला नोकरी करायची होती, मुल नको होते : अपहरणाची खोटी कथा रचणाऱ्या आईचा २४ तासांत पर्दाफाश

I wanted to work.. An innocent 20-day-old baby was murdered by its own mother. | म्हणे मला नोकरी करायची होती.. २० दिवसांच्या निरागस बाळाचा जन्मदात्या मातेनेच केला खून

I wanted to work.. An innocent 20-day-old baby was murdered by its own mother.

गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील २० दिवसांच्या बालकाचा खून जन्मदात्या मातेनेच केल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत केला. पोलिसांनी अपहरणाची बनावट तक्रार देणारी आई रिया राजेंद्रसिंह फाये (२२) हिला अटक केली असून समाजमनाला चटका लावणाऱ्या या प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

१८ नोव्हेंबर रोजी रिया फाये हिने रावणवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा विराजचे अज्ञात व्यक्तीने अपहरण झाल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती. तिने तक्रारीत १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:१५ वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून बाळाला पळवून नेल्याचे म्हटले होते. तिच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपासाला युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांनी देखील प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकिरण नावकार, सहाय्यक फौजदार राजू मिश्रा, पोलीस हवालदार संजय चव्हाण, दिक्षीतकुमार दमाहे यांनी केली.

बयानात विसंगती; आईच गुन्हेगार असल्याचा संशय बळावला

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि पुरुषोत्तम अहेरकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार चौकशी आणि घटनास्थळाच्या बारकाईने निरीक्षणातून महत्त्वाचे धागेदोरे मिळविले. तपासादरम्यान फिर्यादीचे वक्तव्य वारंवार बदलणे, घटनास्थळी जबरदस्तीचा कोणताही पुरावा न मिळणे, घरातील परिस्थितीत संशयास्पद या सर्व कारणांमुळे बाळाच्या आईवरच संशय बळावला. रीयाला ताब्यात घेत कठोर चौकशी करताच व पाेलिसांनी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

‘मला बाळ नको होते’ आरोपी आईची थरकाप उडवणारी कबुली

चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मला नोकरी करायची होती. बाळ आड येत होतं… पतीने गर्भपात करू दिला नाही…, बाळामुळे घरात अडकून पडेन म्हणून त्याला संपवायचं ठरवलं… या कबुलीनंतर पथकाच्या अंगावर काटा आला. १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता घरचे सर्व झोपले असताना तिने मुलगा विराजला उचलले, मागच्या दाराने बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिल्याचे सांगितले.

वैनगंगा नदीत शोधमोहीम, अखेर विराजचा मृतदेह सापडला

कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठी शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत स्थानिक बचाव पथक, मासेमार व गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी समांतर काम केले. काही तासांच्या प्रयत्नानंतर अखेर वैनगंगा नदीतील पुलाखाली विराजचा मृतदेह आढळला.पोलिसांसह स्थानिक नागरिकही या दृश्याने हादरून गेले. मृतदेह शोधण्यासाठी श्वान पथकाची मदत मिळाली.
 

Web Title : माँ ने 20 दिन के बच्चे को मारा, कहा नौकरी करना चाहती थी

Web Summary : गोंदिया में, एक माँ ने 20 दिन के बच्चे की हत्या कर दी, कबूल किया कि वह काम करना चाहती थी। उसने पहले झूठी अपहरण की रिपोर्ट दर्ज कराई थी। पुलिस ने वैनगंगा नदी से बच्चे का शव बरामद किया। घटना से आक्रोश है।

Web Title : Mother Kills 20-Day-Old Baby, Claimed She Wanted to Work

Web Summary : In Gondia, a mother killed her 20-day-old baby, confessing she wanted to work. She initially reported a false kidnapping. Police recovered the baby's body from the Wainganga River. The incident has sparked outrage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.