शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हावासीयांना थोडा दिलासा मात्र चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी ३ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असून एक रुग्ण गोरेगाव शहरातील, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. पण गुरूवारीच यापैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे एकूण दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले.

ठळक मुद्देदिवसभरात सहा कोरोना बाधीत रुग्णांची भर : दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चित्र आहे. गुरूवारी (दि.२८) जिल्ह्यात पुन्हा सहा नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. मात्र यापैकी दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. पण दुसरीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे.गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी ३ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असून एक रुग्ण गोरेगाव शहरातील, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. पण गुरूवारीच यापैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे एकूण दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण ५४ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना बाधीत रुग्णांना आता १० दिवस आयसोलेशन कक्षात ठेवले जात आहे.यानंतर त्यांना कसलीच लक्षणे न दिसल्यास कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करुन रुग्णालयातून सुटी दिली जात आहे. याच नवीन नियमानुसार गुरूवारी जिल्ह्यातील दोन कोरोना बाधीत रुग्णांना कोरोनामुक्त घोषीत करुन रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ही बाब जरी दिलासादायक असली तरी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता मात्र कायम आहे. कोरोना बाधीत आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने पुणे आणि मुंबई येथूनच आलेले आहे.६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्तकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९३४ लोकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ५६ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ८०० नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ६३ नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. १५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ४५९ रुग्णांवर उप चार सुरू असून शासकीय क्वारंटाईन कक्षात ९४ जण दाखल आहेत. गुरूवारी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मात्र त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. सुटी देताना या दोन्ही रुग्णाचे समुपदेशन करण्यात आले.अर्जुनी मोर. तालुका कोरोनाचा हाटस्पॉटजिल्ह्यात सर्वाधिक ३१ कोरोना बाधीत रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. गुरूवारी याच तालुक्यात नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुका कोरोनाचा हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. तर हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून ते मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी गेले होते.त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या