शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कसा शोभला असता भीम माझा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:22 IST

‘कसा शोभला असता भीम नोटावर...’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

ठळक मुद्देमहामानवाची जयंती थाटात : भव्य रॅलीने वेधले लक्ष, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘कसा शोभला असता भीम नोटावर...’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात निघणाऱ्या भव्य रॅलीची शहरातील एक परंपराच आहे. महामानवाला जन्मदिनाची शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शहरात निघणाºया या रॅलीत मोठ्या संख्येत लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला व पुरूष सहभागी होतात. शहरातील प्रत्येक परिसरातील आंबेडकरी समाजबांधव आपापली वेगळी रॅली काढत असतात. यानंतर सर्व रॅली एकत्र आल्याने एक भव्य रॅली तयार होत असून गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेते. शहरातील मुख्य मार्गाने निघत असलेल्या या रॅलीत ढोल-ताशे व डिजेवर धुंद होत नाचत गात आंबेडकरीबांधव बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. यंदाही शहरात भव्य रॅली निघाली व आंबेडकरी बांधवांनी एकच जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ सारख्या गाण्यांवर नाचत तरूणाईने बाबासाहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व रॅलीचा आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला.‘हॅप्पी बर्थ डे.....’ गाण्याची धूमबाबासाहेबांवरील सर्वच गाणी तशीही सुपरहीट व लोकप्रिय आहेत. यामुळेच रॅलीत बाबासाहेबांवरील ही गाणी प्रामुख्याने वाजविली जातात. ही गाणी वाजताच आंबेडकरी बांधवांना एक स्फूर्ती मिळते. तोच प्रकार या रॅलीत दिसून आला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ हे गाणे वाजताच त्यावर जल्लोष करीत तरूणाई बेधूंद नाचत असताना दिसली. तर बाबासाहेबांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्यावरील ‘हॅप्पी बर्थ डे टू यू.....’ या गाण्याचीही रॅलीत एकच धूम होती.ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे वितरणसकाळपासूनच शहरात निघत असलेल्या या रॅलीत चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धही सहभागी होतात. नाचत गात आपला आनंद व्यक्त करीत निघालेल्या या आंबेडकरी बांधवांना तहान व भूक लागल्यास इतरत्र जावे लागू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व पेयांचे वितरण केले जाते. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व काही बांधवांकडून खाजगीस्तरावर ही सर्व व्यवस्था करण्यात येते. त्यानुसार यंदाही रॅलीतील बांधवांसाठी टरबूज, लस्सी, पाणी, सरबत, मिल्कशेक, पुलाव, पोहे, उपमा आदी खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले.