कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ७९ जणांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:01:18+5:30
अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, चना लाईन, पिंडकेपार रस्ता, सेल्सटॅक्स कॉलनी, पांडे लेआऊट या परिसरात नागरिकांची रस्त्यांवर रहदारी वाढली आहे.

कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ७९ जणांना दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनावश्यक घराबाहेर पडणे, सकाळ व सायंकाळी फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे व सामाजिक अंतर न ठेवणे हे कृत्य करून कोरोनाला आमंत्रण देण्याचे काम नागरिकांकडून होत आहे. अशा ७९ जणांना पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावला आहे.
अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, चना लाईन, पिंडकेपार रस्ता, सेल्सटॅक्स कॉलनी, पांडे लेआऊट या परिसरात नागरिकांची रस्त्यांवर रहदारी वाढली आहे. यामुळे विनाकारण रस्त्यांवर येणाºया तसेच हलगर्जी करणाºया ७९ लोकांवर दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये अनावश्यक बाहेर पडणारे १५, सायंकाळी फिरायला जाणारे २३, सामाजिक अंतर न पाळणारे १२ व्यावसायीक, दुकानाबाहेर सामाजिक अंतर न ठेवणाºया ७ ग्राहकांवर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाºया २२ लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर ३४ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरिकांनी अनावश्यक घराबोहर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये, सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर निघू नये, अत्यावश्यक काम असल्यास मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच व्यावसायीकांनी सामाजिक अंतर ठेवावे.
मंगेश शिंदे
पोलीस अधीक्षक, गोंदिया