शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अरे ! कवठा पोलीस आलाय...

By admin | Updated: December 17, 2015 01:51 IST

लहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा ...

पूर्व विदर्भातील हजार मुले सुधारली : ३० वर्षांपासून बालके सुधारण्याचा व्रतमुन्ना नंदागवळी  बाराभाटीलहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा अभ्यासाबद्दल असणारा दुरावा अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग त्रासून जातो. तेव्हा या बालकांवर एकच रामबाण उपाय असतो, तो म्हणजे कवठा पोलीस. या कवठा पोलिसाने मुलांच्या मनात घर केला आहे. अनेक बालके कवठा पोलीस आलाय म्हणून सगळीकडे चर्चा करतात.कवठा पोलीस या नावाने ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे हरिचंद ढाडू मेश्राम (४९). ते कवठ्याचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. हरिचंद मेश्राम यांनी बालके सुधारण्याचा व्रत ३० वर्षांपूर्वीच घेतला असून त्याबाबत त्यांचे कार्य सुरू आहे. ते नेहमी सभ्यपणाने वागतात व पोलिसांच्या गणवेशात असतात. म्हणून बालकांपासून तर पालकांपर्यंत या हरिचंद्रला सगळीकडे कवठा पोलीस असेच संबोधिले जाते व त्यामुळेच हे नाव पडले. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक मुले त्यांनी सुधारली आहेत. संपूर्ण पूर्व विदर्भाला भ्रमण केल्याचेही ते सांगतात. स्वत:च्या जीवनाचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून घेतले. त्यांनी मुले-मुली सुधारण्याचे कार्य हाती घेतले आहे.हरिचंद्र मेश्राम ढिवर जातीचे असले तरी मात्र फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित आहेत. त्यांच्या विचारधारेने जसा समाज घडत गेला, तसेच बालके सुधारून घडवित आहेत. पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे या हरिचंदने अख्खा प्रवास फक्त सायकलने करून त्या परिसरातील, त्या गावातील मुलांना वळणावर आणले. मेश्राम यांचा रुबाबसुद्धा पोलिसासारखा दिसतो. म्हणून मुले पाहता क्षणीच कवठा पोलीस आलाय, असे म्हणत पळत सुटतात. असा न्यारा हरिचंद मेश्राम यांचा बाना आहे.अनेक बालके दुरूस्त करुन मिळेल ती रोजी कमवून जगण्याच्या उंबरठ्यावर हिंमतीने बालके सुधारण्याचा व्रत ते पूर्ण करीत आहेत. या समाजसुधारकाचे संपूर्ण जीवन म्हणजे वयाच्या २० वर्षांपासून ते सदर काम करीत आहेत. तरीसुद्धा स्वत: संसाराच्या कल्पनेने भारावून जात नाही, याचीच खरी दाद द्यावी लागेल. पाठीमागे कुणी नाही, कुणाचा आधार नाही, तरी मात्र हिंमत त्यांनी अजिबात सोडली नाही. अशा या समाजसुधारक मानसाला उदंड आयुष्य लाभो, असेच वाटते. कवठा पोलीस ऊर्फ हरिचंद मेश्राम यांनी आपल्या जीवनातील आतापर्यंतच्या अनेक दु:ख-सुखातील घडामोडींचे अनुभव लोकमतशी बोलताना सांगितले.