शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वॉरीअर्सचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार येथील दरेकसा रोडवरील चेक पोस्टवर थर्मल स्क्रिनिंग टेस्ट घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी प्रवाशांच्या शरीराचे तापमान, पल्स रेट व इतर तपासणी करीत त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्देउष्णतेच्या लाटेत गैरसोयीत कर्तव्यावर : कुलर व पंख्याअभावी आरोग्य कर्मचारी त्रस्त

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आज प्रत्येक पावलावर कोरोना संसर्गाचे संकट वाढत चालले आहे. त्यात सूर्याने आग ओकणे सुरु केले असून या नवतपात लोकांना दुहेरी मार सहन करण्याची वेळ आली आहे. अशात लोकांची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी प्रचंड उष्णतेत आपल्या जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतानाचे चित्र येथील चेक पोस्टवर बघायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून फ्रंट फुटवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार येथील दरेकसा रोडवरील चेक पोस्टवर थर्मल स्क्रिनिंग टेस्ट घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी प्रवाशांच्या शरीराचे तापमान, पल्स रेट व इतर तपासणी करीत त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेण्याचे काम करीत आहे. या चेक पोस्टवरुन छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातून येणारे प्रवासी ये-जा करीत आहेत. त्यांना चेक पोस्टवर थांबवून तपासणी करण्याचे काम २४ तास अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे येथे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाºयांना २४ तास सेवा प्रदान करावी लागत आहे. यात महिला व पुरुष डॉक्टर दोघांना कर्तव्यावर ठेवले जाते. परंतु २४ तास सेवा देताना या आरोग्य पथकाला ज्या प्राथमिक सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या अजिबात मिळत नसल्याने आपले कर्तव्य बजावताना हे कोरोना वारीयर्स स्वत: हतबल होऊन गेलेले दिसतात. ‘लोकमत’ प्रतिनिधीने चेक पोस्टला भेट दिली असता बाजूला आरोग्य पथकासाठी चहाटपरीच्या शेड खाली १ टेबल आणि २ खुर्च्यांची व्यवस्था होती. त्यातही चारही बाजूने खुले असलेले टिनाचे शेड व त्यावर रखरखते उन्ह पडत असल्याने तापलेले पत्रे व त्याखाली बसलेले किंवा उभे असलेले आरोग्य कर्मचारी प्रवाशांची तपासणी करीत असताना दिसले. अंगातून घामाच्या धारा निघत असताना सुद्धा ते आपल्या कर्तव्य चोखोपणे योद्धासारखे खंबीरपणे पार पाडीत आहेत. अशात त्यांच्यासाठी पिण्याच्या ठंड पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून होणे आवश्यक असताना ती सोय मुळीच दिसून आली नाही. जास्त तहान लागली की चेक पोस्टवरील पोलिसांकडून पाणी मागून त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गरमी पासून होणारा त्रास कमी करण्यासाठी कुलर किंवा पंख्याची सोय आवश्यक असून अशी कोणतीच सोय त्यांच्यासाठी करण्यात आली नव्हती.अशात दुसºयांच्या आरोग्याची काळजी घेणाºयांना स्वत:च्या आरोग्याशी खेळण्याची वेळ येत आहे. ही बाब आरोग्य विभागाला लक्षात येत आहे की नाही याचे आश्चर्य वाटले.जेवणासाठी वेळच मिळत नाहीया चेक पोस्टवरुन २४ तास लोकांचे येणे-जाणे सुरु असते. राज्य महामार्ग ३ राज्यांना जोडणारा असल्यामुळे इतर प्रांतातील प्रवासी सध्या सतत येण्या जाण्याचे प्रयत्न करी आहेत. त्यामुळे आरोग्य पथक नेहमीच व्यस्त राहत असून त्यांना नास्ता व जेवणासाठीही वेळ मिळत नाही. अशात तासनतास उपाशी राहूनही ते कर्तव्य बजावताना दिसून आले. दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचत असून उष्ण वाºयाची लाट शरीराला खूपच त्रासदायक व आरोग्याला धोकादायक असून बसण्याच्या ठिकाणी ग्रीन शेडची व कुलरची सोय असली पाहिजे. कोरोनाशी चालणारा संघर्ष किती काळ सुरु राहील हे सांगणे कठीण आहे. अशात कोरोना वॉरीयर्सच्या आरोग्याची काळजी सुद्धा आरोग्य विभागाने किंवा शासनाने घेणे आवश्यक आहे. नाही तर कोरोनाशी लढणे अवघड होऊ शकते. आरोग्य कर्मचाºयांनी आपली व्यथा सांगितल्या नाही तरी त्या विभागाने समजून घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या