दुर्दैवी; बहिणीला राखी बांधायला निघाला.. रेल्वेतून उतरताना चाकाखाली आला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 08:10 IST2021-08-24T08:10:00+5:302021-08-24T08:10:02+5:30

Gondia News गोंदिया रेल्वे स्थानक गेल्यानंतर झोप उघडल्याने धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादात गाडीतून खाली पडल्याने युवकाचा मृत्यू झाला.

He went to tie rakhi for his sister .. While getting off the train, he came under the wheel .. | दुर्दैवी; बहिणीला राखी बांधायला निघाला.. रेल्वेतून उतरताना चाकाखाली आला..

दुर्दैवी; बहिणीला राखी बांधायला निघाला.. रेल्वेतून उतरताना चाकाखाली आला..

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मजुरीसाठी नागपूरला गेलेला भाऊरायाला बहिणीच्या हातून राखी बांधण्यासाठी २२ ऑगस्टच्या पहाटे नागपूरवरून गोंदिया येथे येण्यासाठी रेल्वेत बसला. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकावर गाडी येईपर्यंत त्याला झोप लागली. गोंदिया रेल्वे स्थानक गेल्यानंतर झोप उघडल्याने धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादात गाडीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.


राकेश गिरधारी धुर्वे (१९) रा. झरीया खैरलांजी बालाघाट असे मृतकाचे नाव आहे. गुदमा ते गोंदिया रेल्वे लाइन पोल क. ९९६/३०-३२ चे जवळील टेमणी नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. तो नागपूर येथे मजुरीचे काम करीत होता. राखी सणासाठी तो रेल्वेगाडीने नागपूरवरून गोंदियाला येत असतांना त्याला गाडीतच झोप लागली. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटलेली गाडी टेमणीशिवार परिसरातून जात असताना त्याची झोप उघडली. गाडी हळू होतांना दिसल्याने धावत्या गाडीतून उडी घेतल्याने रेल्वेच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

पोलीस नायक मेहतलाल खल्लारी यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नायक देवाजी बहेकार, जीवन जाधव करीत आहेत.

 

Web Title: He went to tie rakhi for his sister .. While getting off the train, he came under the wheel ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.