शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादान योजनेचे अनुदान वाढविणार

By admin | Updated: April 1, 2015 00:47 IST

सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द जोडप्यांना सध्या १० हजार रुपये अनुदान कन्यादान योजनेतून शासनातर्फे दिले जातात.

गोंदिया : सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द जोडप्यांना सध्या १० हजार रुपये अनुदान कन्यादान योजनेतून शासनातर्फे दिले जातात. सामाजिक न्याय विभागाकडून या योजनेच्या जाचक अटी शिथील करून अनुदानात वाढ करून २५ हजार रुपये देण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. बघेडा येथील श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समितीतर्फे आयोजित सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.गोपालदास अग्रवाल, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खोमेश रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सभापती मोरेश्वर कटरे, डॉ.अंशु सैनी, अ‍ॅड. नामदेव किरसान, हनुवत वट्टी, झामसिंग बघेले, संतोष चव्हाण, नंदू बिसेन, भरत क्षत्रिय, लिखेंद्र बिसेन, तहसीलदार शिल्पा सोनाले, तहसीलदार भंडारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आ.संजय पुराम यांनी आपण या क्षेत्राचा विकासाकरिता कटिबध्द असल्याचे सांगितले. मांडोदेवी समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी संचालन करताना मांडोदेवी देवस्थानाकरिता शासनाकडे ५ कोटींची मागणी केली. तसेच कन्यादान योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या विवाह सोहळ्याचा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष भैयालाल सिंद्राम, कुसन घासले, सीताराम अग्रवाल, डॉ. लक्ष्मण भगत, दिलीप चौधरी, हुकुमचंद अग्रवाल, मुन्ना असाटी, चंद्रशेखर बोपचे, अशोक देशमुख, धुर्वराज पटले, देवेंद्र तामसेटवार, सखाराम सिंद्राम, शालीकराम हुकरे, योगराज धुर्वे, प्रेमलाल धावडे, रामदास ब्राम्हणकर, श्यामराव ब्राम्हणकर, किशोर शेंडे, दिलीप खंडेलवाल, उमेश सेवूत, महेश घासले, पोषण मडावी, ग्रामसेवक कुबडे, शिवा सरोटे, प्रकाश शिवणकर, गिरधारी बघेले, गुड्डू पटले, रोहित अग्रवाल, राहुल अग्रवाल, हेमंत भुते, टोपराम बहेकार, महेंद्र मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)