शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

By admin | Updated: February 10, 2016 02:11 IST

गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या सतोना धामनगाव ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी संगनमत करून प्राप्त विकास निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला.

रावणवाडी : गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या सतोना धामनगाव ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी संगनमत करून प्राप्त विकास निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला. त्याबाबद ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात येऊनही आजतगायत कधीच चौकशी करण्यात आली नाही. या विरोधात ९ फेब्रुवारी रोजी दोन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय कम्युनिष्ट पार्टीचा वतीने धरने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सचिवांनी संबंधितांना कळविले आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही ग्रामपंचायतींच्या सचिवांनी सरपंचाला हाताशी घेऊन बऱ्याच प्रमाणात नियमबाह्य कामे केली. त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वरिष्ठांना १ जून २०१५ व २९ जून २०१५ रोजी करण्यात आली. या दोन्ही वेळा झालेल्या गैरप्रकाराची तक्रार गावकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीचा तपास अद्याप करण्यात आले नाही. यासाठी ग्रामस्थांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीवर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.रस्ता बांधकाम, मनरेगा वृक्षारोपण, मजुरांचा मोबदला, तंटामुक्त समितीला प्राप्त निधीचा मनाप्रमाणे अनागोंदी खर्च, कामावर न जाताच बँक खात्यात निधी जमा होणे आदी नियमबाह्य विकास कामे झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. ग्रामीण नागरिकांकडून या बेकायदेशीर प्रकाराची तक्रार झाली. मात्र वरिष्ठांनी तक्रारीची दखलच घेतली नाही. परिणामी गावकऱ्यांना जनआंदोलन उभे करण्याची पाळी आली आहे. मंगळवारी ९ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतचे सचिव व सरपंचावर कारवाही झाली नाही तर १७ फेब्रुवारीला गोंदिया बालाघाट राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची माहिती संबंधित कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. (वार्ताहर)