शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वेतन भत्त्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही ग्रामपंचायतीने वेतन आणि भत्ता दिला नाही. यापुर्वीचे सुध्दा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार व पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून केली कामे : शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वाखाली आपल्या थकीत वेतन व भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.११) उपाशी पोटी व काळी फित लावून आंदोलनास सुरूवात केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जि.प. प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही ग्रामपंचायतीने वेतन आणि भत्ता दिला नाही. यापुर्वीचे सुध्दा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार व पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. गाव पातळीवर कोरोना महामारीच्या निर्मुलन मोहिमेत अल्पशा पगारावर जिवन जगणारा हा कर्मचारी आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाळत आहे.या मोहिमेत दिवस रात्र कामे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. वेतन, भत्ते आणि ईतर सेवाशर्तीची ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी करुन घेण्याची जवाबदारी राज्याचे ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्यकार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना क्रमबद्धरित्या दिली आहे. सेवाशर्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. शासनाने दिलेल्या या दोन्ही जवाबदारीचे पालन करण्यात हे अधिकारी असमर्थ ठरत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघाने याचा निषेध व्यक्त केला आहे. अधिकारी वर्गाच्या अशा धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे. अधिकाऱ्यांच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा आणि वेतन भत्ते थकीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.११) उपाशी राहून व काळ्या फिती लावून कामे करुन शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक