वेतन भत्त्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:50+5:30
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही ग्रामपंचायतीने वेतन आणि भत्ता दिला नाही. यापुर्वीचे सुध्दा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार व पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

वेतन भत्त्याच्या मागणीसाठी ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वाखाली आपल्या थकीत वेतन व भत्ता मिळण्याच्या मागणीला घेवून जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.११) उपाशी पोटी व काळी फित लावून आंदोलनास सुरूवात केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जि.प. प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही ग्रामपंचायतीने वेतन आणि भत्ता दिला नाही. यापुर्वीचे सुध्दा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार व पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. गाव पातळीवर कोरोना महामारीच्या निर्मुलन मोहिमेत अल्पशा पगारावर जिवन जगणारा हा कर्मचारी आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाळत आहे.या मोहिमेत दिवस रात्र कामे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थकीत ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. वेतन, भत्ते आणि ईतर सेवाशर्तीची ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी करुन घेण्याची जवाबदारी राज्याचे ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्यकार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना क्रमबद्धरित्या दिली आहे. सेवाशर्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. शासनाने दिलेल्या या दोन्ही जवाबदारीचे पालन करण्यात हे अधिकारी असमर्थ ठरत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघाने याचा निषेध व्यक्त केला आहे. अधिकारी वर्गाच्या अशा धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे. अधिकाऱ्यांच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा आणि वेतन भत्ते थकीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.११) उपाशी राहून व काळ्या फिती लावून कामे करुन शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.